E-Shram Card portal द्वारे कामगारांसाठी सरकारची नवी योजना, २ लाखांपर्यंतचा विमा देणार, जाणून घ्या अधिक माहिती | पुढारी

E-Shram Card portal द्वारे कामगारांसाठी सरकारची नवी योजना, २ लाखांपर्यंतचा विमा देणार, जाणून घ्या अधिक माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑगस्ट २०२१मध्ये केंद्र सरकारने असंघटित वर्गातील कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल (E-Shram Card) सुरू केले. सरकारला आशा आहे की देशभरातील ३८ कोटी कामगारांना याचा फायदा होणार आहे. या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. या योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने हे पोर्टल काढण्यात आले आहे.

याचबरोबर पोर्टलवर ज्यांची नोंद होणार आहे त्यांना विम्या कवच मिळणार आहे. सरकारने ताज्या आकडेवारीत सांगितले आहे की (E-Shram Card) सुरू झाल्यापासून १०० दिवसांत ११ कोटी कामगारांनी नोंदणी केली आहे.

E-Shram Card : कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांची माहीती

कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी याबाबत काल (दि.०९) राज्यसभेत सांगितले की, ११ कोटी कामगारांनी १०० दिवसांच्या आत ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. यादरम्यान सरकार त्यांना विमा कव्हर देणार आहे.

या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकारी योजना आणि सेवांचा लाभ मिळणार आहे. यादव यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ही माहिती दिली.

असंघटित कामगार असे आहेत जे घरोघरी काम करतात किंवा जे स्वतःचे काम शोधतात. असे कामगार ESIC (Employees State Insurance Corporation) EPFO ​​(कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) चे सदस्य नाहीत, त्यामुळे त्यांना त्यांचे लाभ देखील मिळू शकत नाहीत. ते सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये येतात. यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

कोविडच्या काळात असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी सरकारने उचललेल्या विविध पावलांचा संदर्भ देताना केंद्रीय मंत्री यादव म्हणाले की, भारत सरकार चार पद्धतीने सर्वेक्षण करत आहे. यामध्ये असंघटित क्षेत्र, स्थलांतरित कामगार आणि घरकामगार यांचा समावेश आहे. संस्था आधारित सर्वेक्षणाव्यतिरिक्त. स्थलांतरित कामगार आणि घरकामगारांशी संबंधित सर्वेक्षणावरही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ई-श्रम कार्डचे फायदे?

ई-श्रम कार्ड मिळाल्यानंतर कामगारांना देशाच्या कोणत्याही भागात काम मिळणे सोपे होणार आहे.

कार्डद्वारे कामगार विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभही घेऊ शकतात.

कार्ड अंतर्गत मोफत अपघात विमाही दिला जाणार आहे.

नोंदणीकृत कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास, कामगार किंवा कुटुंबाला दोन लाखांपर्यंत विमा रक्कम मिळणार आहे.

आंशिक अपंगत्व असल्यास, ही रक्कम एक लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे.

याचा फायदा घेण्यासाठी अगदी साधी प्रक्रिया करावी लागणार आहे. ज्या कामगाराचा अपघात झाला, त्याचे वारस ई-श्रमच्या पोर्टलवरच विमा रकमेचा दावा करू शकतात किंवा त्याच्या बँकेशी संपर्कही करू शकतात.

नोंदणी अशा पद्धतीने करू शकता?

असंघटित कामगार पोर्टलवर त्यांचा आधार क्रमांक किंवा आधार कार्ड किंवा बँक खात्याशी जोडलेल्या फोन नंबरद्वारे नोंदणी करू शकतात.

नोंदणीनंतर, त्यांना एक कार्ड दिले जाईल. या कार्डला ई श्रम कार्ड असे नाव देण्यात आले आहे.

या पोर्टलवर नोंदणीसाठी उत्पन्नाचे कोणतेही निकष ठेवण्यात आलेले नाहीत, परंतु आयकर भरणारे कामगार येथे नोंदणी करू शकत नाहीत.

ई श्रम पोर्टल तुम्हाला प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अॅप तुम्ही डाऊनलोड केल्यावर यामध्ये आपली सविस्तर माहिती भरायची आहे.

Back to top button