Helicopter Crash : भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाला मोठा धक्का, चीनचा कांगावा

बिपीन रावत
बिपीन रावत
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन डेस्क

Helicopter Crash : चीनचा पुन्हा एकदा संवेदनहीन चेहरा समोर आला आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातातील मृत्यूनंतर चीनने ग्लोबल टाइम्स या मुखपत्रातून भारतीय लष्कराच्या शिस्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनने जनरल रावत यांच्या मृत्यूला भारतीय लष्कराच्या कमतरतेचे फलित म्हटलंय.

भारताच्या संरक्षण प्रमुखाच्या मृत्यूने केवळ भारतीय सैन्याची शिस्त आणि लढाऊ तयारीचा अभावच उघड केला नाही तर देशाच्या लष्करी आधुनिकीकरणालाही मोठा धक्का बसला असल्याचे चीनने म्हटले आहे.

वैमानिकाने अधिक काळजीपूर्वक किंवा कुशलतेने उड्डाण केले असते तसेच हवामानात सुधारणा होईपर्यंत हेलिकॉप्टर उड्डाणाला उशीर केला असता तर हेलिकॉप्टरचा अपघात टाळता आला असता, असेही चीनने ग्लोबल टाइम्समध्ये म्हटले आहे.

तामिळनाडूतील कुन्नूर वनक्षेत्रात बुधवारी लष्कराचे 'एमआय 17 व्ही 5' हे हेलिकॉप्टर (Helicopter Crash) कोसळले. त्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका तसेच लष्कराचे 12 अधिकारी होते. पैकी बिपीन रावत, मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वरुण सिंह हे एकमेव या दुर्घटनेतून बचावले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज गुरुवारी लोकसभेत दिली होती.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : जनरल बिपीन रावत : गोरखा रायफल्‍स ते देशाचे पहिले सीडीएस |Bipin Rawat | CDS

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news