NEET Exam 2024 : नीट व नेट परीक्षा गोंधळावरून विद्यार्थी भडकले, शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने

NEET Exam 2024 : नीट व नेट परीक्षा गोंधळावरून विद्यार्थी भडकले, शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कथित पेपरफुटीच्या संशयावरून रद्द करण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेतील (नेट) गोंधळाविरोधात आक्रमक झालेल्या विद्यार्थी संघटनांनी गुरूवारी नवी दिल्लीत शिक्षण मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन केले. निदर्शने करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आँल इंडिया स्टुंडेंट्स युनियनचे दिल्लीचे अध्यक्ष अभिज्ञान आणि जेएनयु विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रणविजय यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी शिक्षण मंत्रालयाबाहेर "रास्ता रोको" आंदोलन करण्यात आले. नीट आणि नेट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गोंधळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, युजीसीचे अध्यक्ष मामिदला जगदीश कुमार यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी आँल इंडिया स्टूडंट युनियनची मागणी आहे.

शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर एनएसयुआयचीही निदर्शने

नीट व नेट परीक्षेतील गोंधळाविरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयुआय) संघटनेच्या कार्यकर्त्यांही शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर तीव्र निदर्शने केली. यावेळी शिक्षणमंत्री व एनटीएच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news