NEET exam row : “नीट परीक्षेत 0.001 टक्के निष्‍काळजीपणा असेल तरी कारवाई करा” : सुप्रीम कोर्टाचे निर्देश

NEET exam row : “नीट परीक्षेत 0.001 टक्के निष्‍काळजीपणा असेल तरी कारवाई करा” : सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांबाबत दाखल याचिकेवर आज (दि.१८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) अनेक प्रश्न विचारले. NEET परीक्षेत 0.001 टक्के निष्काळजीपणा असला तरी त्यावर कारवाई करावी, असे न्यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे म्हटले आहे. तसेच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 'एनटीए' आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणी उत्तर दाखल करण्यास सांगितले.

याचिकाकर्त्याचे वकील दिनेश जोतवानी यांनी ANI शी बोलताना सांगितले की, " या प्रकरणात न्यायालयाला मदत करा, तो तुमचा ग्राहक आहे असे समजू नका, त्याला विरोधी कार्यवाही करु नका. नीट परीक्षेत 0.001% काहीही घडत असल्याचे NTA अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे स्‍पष्‍ट निर्देश आजच्‍या सुनावणीत सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिले आहेत. ८ जुलै रोजी या मुख्य याचिकेवर सुनावणी होईल. त्‍यापूर्वी एनटीएला उत्तर दाखल करावे लागेल."

1,563 उमेदवारांची हाेणार पुनर्परीक्षा

NEET-UG 2024मध्‍ये ग्रेस गुण देण्‍यात आलेल्‍या 1,563 पेक्षा अधिक उमेदवारांच्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.  हे गुण परीक्षेदरम्यान वाया गेलेल्या वेळेची भरपाई करण्याच्या उद्देशाने दिले हाेते. आता या 1,563 उमेदवारांचे गुणपत्रक रद्द करण्‍यात आले आहे, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 13 जून रोजी सर्वोच्च न्यायालयात दिली होती. दरम्‍यान, वैद्यकीय प्रवेशसाठीचे NEET-UG समुपदेशनाला स्थगिती देण्‍यात येणार नाही, असा पुनरुच्चार न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्‍या खंडपीठाने केला होता.

नीट परीक्षेत पेपरफुटी व निकालातील वाढीव गुण प्रकरणी दाखल याचिकेवर सर्वप्रथम ११ जूनला सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली हाेती. परीक्षेच्या पावित्र्याला धक्का बसला आहे, त्यामुळे एनटीएकडून उत्तर हवे आहे, असे स्‍पष्‍ट करत सर्वोच्‍च न्‍यायालयाने  नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला नोटीस बजावली हाेती. तसेच पुढील सुनावणी ८ जुलै राेजी हाेईल. ताेपर्यंत 'एनटीए'ने उत्तर दाखल करावे, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले हाेते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news