Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टीचा सलग चौथ्या सत्रात नवा उच्चांक

बीएसई आणि एनएसई
बीएसई आणि एनएसई

पुढारी ऑनलाईन डेस्क : मजबूत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स, निफ्टी बुधवारी (दि. १९) सलग चौथ्या सत्रात नव्या विक्रमी उच्चांकावर खुले झाले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने १७० हून अधिक अंकांनी वाढून ७७,५८१ च्या अंकाला स्पर्श केला. त्यानंतर तो ७७,३०० च्या पातळीवर येत सपाट आला. तर निफ्टी २३, ५६० वर व्यवहार करत आहे. बाजारातील विक्रमी तेजीत बँकिंग आणि आयटी स्टॉक्स आघाडीवर आहेत.

सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय हे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत. तर टायटन, एलटी, एनटीपीसी, मारुती, पॉवर ग्रिड हे शेअर्स घसरले.

निफ्टीवर इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर टायटन, बीपीसीएल, एलटी, अदानी एंटरप्रायजेस, अपोलो हॉस्पिटल हे शेअर्स घसरले आहेत.

निफ्टी बँकचा नवा उच्चांक

निफ्टी बँक १.२२ टक्क्यांनी वाढून ५१ हजारांचा नवा उच्चांक नोंदवला. निफ्टी बँकवर इंडसइंड आणि आयसीआयसीआय बँकेचा शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढून टॉप गेनर्स ठरले आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news