हप्ता परत देणारा टर्म इन्शुरन्स प्लॅन

हप्ता परत देणारा टर्म इन्शुरन्स प्लॅन

[author title="मेघना ठक्कर" image="http://"][/author]

रिटर्न ऑफ प्रीमियमचा टर्म प्लॅन हा एक स्टँडर्ड टर्म प्लॅनप्रमाणेच आहे. ही योजना जीवन विमा पॉलिसीप्रमाणे काम करते आणि पॉलिसीच्या लाभार्थ्यांना डेथ बेनिफिट प्रदान करते. यातील विशेष गुण म्हणजे मॅच्योरिटी बेनिफिट. पॉलिसीधारक अतिरिक्त हप्ता भरून टर्म प्लॅन विथ रिटर्न ऑफ प्रीमियमचा फायदा घेऊ शकतात.

लाईफ इन्शुरन्स किंवा जीवन विम्याचा मुद्दा येतो तेव्हा आपल्या डोक्यात पहिल्यांदा टर्म इन्शुरन्स प्लॅन येतो. यामागचे कारण म्हणजे हा प्लॅन बर्‍यापैकी स्वस्त असतो आणि त्यातील जोखमीचे कवचही अधिक असते. आपल्या कुटुंबाला भविष्यातील आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी प्रत्येक व्यक्तींनी टर्म इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे. त्याचवेळी एखादी व्यक्ती टर्म इन्शुरन्स घेते तेव्हा त्याचा काही प्रमाणात का होईना कॅशबॅक मिळेल, असा विचार करते. कारण, हा प्लॅन बराच काळ चालतो आणि त्यात विमाधारकाला कोणताही फायदा मिळत नाही. दीर्घकाळ हप्ते भरता भरता तो कंटाळून जातो. लोकांची हीच मानसिकता पाहून विमा कंपनीने एक नव्या प्रकारचा टर्म इन्शुरन्स प्लॅन 'टर्म प्लॅन विथ रिटर्न ऑफ प्रीमियम' बाजारात आणला.

टर्म प्लॅन विथ रिटर्न ऑफ प्रीमियम म्हणजे काय?

टर्म प्लॅनच्या बदल्यात काहीतरी फायदा मिळावा असा उद्देश ठेवणार्‍या लोकांसाठी कंपनीने टर्म प्लॅन विथ रिटर्न ऑफ प्रीमियम सादर केला. टर्म इन्शुरन्सच्या या प्लॅनमध्ये कंपन्या विमाधारक ग्राहकाला हप्त्याची रक्कम परत देण्याचा पर्याय देते. परिणामी, विमाधारकाला हा प्लॅन फायदेशीर वाटू शकतो. हप्ता परत देणारा हा टर्म प्लॅन सामान्य टर्म इन्शुरन्स प्लॅनप्रमाणेच आहे; मात्र या योजनेतील नियमित प्लॅनपेक्षा असणारे वेगळेपण म्हणजे 'सर्व्हायव्हल बेनिफिट'. पॉलिसीधारक या प्लॅनच्या माध्यमातून सर्व्हायव्हल बेनिफिट मिळवू शकता आणि विमाधारकाने भरलेला हप्ता परत मिळवू शकता. हप्ता परत देण्याच्या योजनेत जीएसटीसह वसूल केलेली रक्कम परत मिळत नाही. या प्लॅनशी संबंधित अ‍ॅड ऑन बेनिफिटमध्ये अपंगत्व, आकस्मिक मृत्यूचे वारसदारास मदत आणि क्रिटीकल इलनेसपासून सुरक्षा याचा समावेश आहे.

मॅच्योरिटीवर हप्ता परत मिळतो

रिटर्न ऑफ प्रीमियमचा टर्म प्लॅन हा एक स्टँडर्ड टर्म प्लॅनप्रमाणेच आहे. ही योजना जीवन विमा पॉलिसीप्रमाणे काम करते आणि पॉलिसीच्या लाभार्थ्यांना डेथ बेनिफिट प्रदान करते. यातील विशेष गुण म्हणजे मॅच्योरिटी बेनिफिट. पॉलिसीधारक अतिरिक्त हप्ता भरून टर्म प्लॅन विथ रिटर्न ऑफ प्रीमियमचा फायदा घेऊ शकतात. या प्लॅनसाठी आपण सम अ‍ॅश्योर्ड अर्थात विमा रकमेची स्वत: निवड करू शकता आणि पॉलिसीचा कालावधीदेखील निवडू शकता. आपण निवडलेला कालावधी आणि जोखमीचे कवच यानुसार हप्ता निश्चित होतो. पॉलिसी मॅच्योर होते तेव्हा विमाधारकाने भरलेला हप्ता परत करते.

कोणासाठी प्लॅन उपयुक्त?

आर्थिक जबाबदारीचे स्वरूप प्रत्येकाचे वेगळे राहू शकते. जीवनशैली अणि उत्पन्नाचे मार्गदेखील वेगवेगळे राहू शकतात. कोणतीही व्यक्ती वर्तमानाकाळाबाबत समाधानी असते. त्याचे खर्च आरामात सुरू असतात आणि कोणतीही अडचण नसते; परंतु भविष्यासाठी त्याच्याकडे काहीच नसते. अर्थात, ते नसण्याच्या स्थितीत कुटुंबीयांचे आर्थिक भवितव्य कसे राहील, याबाबत तो चिंताग्रस्त असतो. अशा लोकांसाठी प्रीमियम परत देणारा टर्म प्लॅन इन्शुरन्स योजना महत्त्वाची ठरते. अर्थात, आतापर्यंत बहुतांश लोकांनी नेहमीचाच टर्म प्लॅन घेतलेला आहे. परंतु, हा नवीन पर्याय आल्याने अनेकांनी त्यास पसंती दिली.

अविवाहितही घेऊ शकतात प्लॅन

साधारणपणे हप्ता परत देणारा टर्म इन्शुरन्स प्लॅन हा अविवाहित लोकांना उपयुक्त आहे. निवृत्तीजवळ पोहोचलेले परंतु विवाहित नसलेल्या लोकांसाठी हा प्लॅन चांगला राहू शकतो. यामागचे काही कारणे असू शकतात. यात महत्त्वाचे कारण म्हणजे वयस्कर आई-वडिलांच्या जबाबदारीमुळे त्या व्यक्तीने विवाह केलेला नसतो. अशा लोकांना हप्ता परत देणारा प्लॅन चांगला राहू शकतो. एखादा व्यक्ती वयस्कर पालकांची काळजी घेतो आणि कालांतराने तो खर्च उचलण्यास सक्षम राहत नाही तेव्हा त्याला हप्ता परत देणारा टर्म प्लॅन चांगला ठरू शकतो. याशिवाय एखादा व्यक्ती विवाहित असेल आणि त्यास अपत्य नसतील आणि तो पत्नीच्या उत्पन्नावर अवलंबून असेल, तर त्याच्यासाठीही रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅन चांगला आहे. या प्लॅनमध्ये लाईफ कव्हरचा समावेश असतोच. त्याचवेळी पॉलिसीच्या मॅच्योरिटीवर मिळणारा लाभ हा भविष्यातील आर्थिक चिंता दूर करतो.

या प्लॅनवर मिळणारा फायदा

रिटर्न ऑफ प्रीमियम टर्म प्लॅन घेणारा व्यक्ती कर लाभापासून वंचित राहत नाही. सामान्य टर्म इन्शुरन्स घेणार्‍या व्यक्तीला मिळणारी कर सवलत या प्लॅनलादेखील लागू आहे. टर्म प्लॅनसाठी भरलेला हप्ता आणि जोखीम कवचची रक्कम ही पूर्णपणे करमुक्त आहे. रिटर्न ऑफ प्रीमियम विमा योजनेनुसार दीड लाखापर्यंतच्या हप्त्याच्या रकमेवर कर सवलत मिळवू शकता.

हप्त्याची रक्कम जादा

या योजनेत हप्ता परत मिळत असल्याने विमा कंपन्यांकडून हप्त्याची रक्कम ही जादा ठेवली जाते. अर्थात, यात कर सवलत मिळवण्यापेक्षा हप्ता संतुलित ठेवू शकतो. या प्लॅनमध्ये विमाधारकांना आपल्या गरजेनुसार सम अ‍ॅश्यूर्ड, कालावधी आणि हप्ता भरण्याचे स्वातंत्र्य ठेवले आहे. त्याचबरोबर पॉलिसी मॅच्युअर झाल्यानतर एकरकमी पैसे परत मिळतात. या प्लॅननुसार आपल्याला 60 वर्षांपर्यंत हप्ता भरावा लागतो आणि त्यानंतर त्यास वयाच्या 85 वर्षांपर्यंत मुुदतवाढ देऊ शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news