महाकाल चरणी जगातील सर्वात महागडा आंबा अर्पण, किंमत वाचून व्हाल थक्‍क

महाकाल चरणी जगातील सर्वात महागडा आंबा अर्पण, किंमत वाचून व्हाल थक्‍क
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जबलपूर येथे राहणार्‍या भाविकाने उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात जगातील सर्वात महागडा आंबा अर्पण केला. जबलपूरचे रहिवासी संकल्प सिंह परिहार यांनी सलग तिसर्‍या वर्षी आपला हा उपक्रम सुरु ठेवला आहे.

जबलपूरचे रहिवासी संकल्प सिंह परिहार हे बाबा महाकालचे निस्सीम भक्त आहेत. अत्‍यंत प्रतिकूल परिस्थितीत त्‍यांनी फार्म हाऊस सुरू केला. त्‍याला महाकाल हायब्रिड फॉर्म असे नाव देण्यात आले. सुरुवातीला 10 एकरांवर पसरलेल्या या फार्म हाऊसमध्ये आंब्याचे फार कमी प्रकार होते; पण, आता जवळपास १५०० आंब्याची झाडे आणि 16 ते 17 जाती आहेत.

आंब्याची किंमत प्रति किलो 2,70,000 रुपये

'अमर उजाला'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, जबलपूरमधील न्यू भेडाघाटाजवळ संकल्प सिंह यांचे फार्म हाऊस आहे. जिथे जगातील सर्वात महाग आंबा मियाझाकी आहे ज्याची आंतरराष्ट्रीय किंमत 2,70,000 रुपये प्रति किलो आहे. या फार्म हाऊसमध्ये ऑस्ट्रेलियन आंब्याचा प्रकार R2 V2 आणि जपानमधील प्रसिद्ध टोमेगो आंब्याची झाडेही लावण्यात आली आहेत. संकल्प सिंह परिहार हे बाबा महाकाल यांचे निस्सीम भक्त आहेत, ते आंबा पिकाचे पहिले फळ बाबा महाकाल यांना अर्पण करतात. यावेळी सलग तिसऱ्या वर्षी उज्जैनला त्यांनी बाबा महाकाल यांना आंबे अर्पण केले आहेत.

आंब्याच्‍या रक्षणासाठी खास सुरक्षा

महाकाल ही संकरीत आंब्याची एक मौल्यवान जात आहे. या आंबाच्‍या सुरक्षेसाठी सुमारे डझनभर कुत्री फॉर्म हाउसमध्‍ये पहारा देतात. या कुत्र्यांना दिवसा पिंजऱ्यात ठेवले जाते, मात्र रात्री आंब्यांचे रक्षण करण्यासाठी मोकळे सोडले जाते.
आंतरराष्ट्रीय बाजारात 2,70,000 रुपये किंमत असलेल्या मियाझाकी आंब्याचे वजन सुमारे 700 ते 800 ग्रॅम आहे. यासोबतच फार्म हाऊसमध्ये गुलाब आंबा, ऑस्ट्रेलिया R2 V2, जपानचा प्रसिद्ध टोमॅटो आंबा अशा अनेक जाती आहेत.हे आंबे रसायनाऐवजी गवतावर पिकवले जातात. आंब्याची ही जात इतर आंब्यांपेक्षा नंतर येते. या कारणास्तव, हे आंबे बाजारात जुलैच्या शेवटच्या महिन्यात आणि ऑगस्टच्या सुरुवातीला उपलब्ध होतात.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news