दिल्लीत नो फ्लाय झोन; PM मोदींच्या शपथविधी सोहळ्यात ‘अशी’ असेल त्रिस्तरीय सुरक्षा

दिल्लीत नो फ्लाय झोन; PM मोदींच्या शपथविधी सोहळ्यात ‘अशी’ असेल त्रिस्तरीय सुरक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात अभेद्य सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. जमिनीपासून आकाशापर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानीला रविवारपासून दोन दिवस (९ आणि १०जून) नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित केले आहे. या कालावधीत पॅराग्लायडर्स, पॅरा-मोटर, हँग ग्लायडर, यूएव्ही, यूएएस, हॉट एअर बलून, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट आणि रिमोट ऑपरेटेड एअरक्राफ्टच्या उड्डाणावर बंदी असेल. सुरक्षेसाठी एसपीजी, राष्ट्रपती सुरक्षा रक्षक, आयटीबीपी, दिल्ली पोलीस, गुप्तचर विभागाचे पथक, निमलष्करी दल, एनएसजी ब्लॅक कॅट कमांडो आणि एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. सुरक्षा क्षेत्रात कोणतेही अनधिकृत वाहन येऊ नये यासाठी सखोल तपासणी करण्यात येत आहे.

अशी असेल त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था

आतील स्तर : राष्ट्रपती भवन आणि कर्तव्य पथ भोवती उच्च सुरक्षा क्षेत्र असेल, येथे शपथविधी होणार आहे.
बाहेरील स्तर : परदेशी राष्ट्रप्रमुख आणि प्रतिष्ठित व्यक्ती राहणार असलेली हॉटेल्सभोवती सुरक्षिततेचा दुसरा स्तर असेल. यामध्ये ताज, मौर्य, लीला आणि ओबेरॉय हॉटेल्सचा समावेश आहे.
सर्वात बाहेरील सुरक्षा : मध्य दिल्लीच्या आसपास सुरक्षेचा तिसरा स्तर असेल. यामध्ये जमिनीपासून आकाशापर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात

दिल्ली पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, शपथविधी सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती लक्षात घेता, ग्लायडर, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोटली पायलट एअरक्राफ्ट, हॉट एअर फुगे, पॅराजम्पिंगवर बंदी असेल. शपथविधी समारंभात ड्रोन किंवा लहान-मोठ्या कोणत्याही प्रकारच्या उड्डाणांवर बंदी असेल. उंच इमारतींमध्ये ड्रोनविरोधी यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. एनएसजीकडे उपलब्ध असलेली ड्रोनविरोधी यंत्रणा शपथविधी सोहळ्यादरम्यान तैनात केली जाईल.

परदेशी पाहुण्यांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था

परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत गुप्तचर विभागाचे अधिकारीही परदेशी पाहुण्यांसाठी तैनात करण्यात येत आहेत. परदेशी पाहुणे ज्या हॉटेलमध्ये राहणार आहेत त्या हॉटेलमधून शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजेच राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था असेल.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news