नरेंद्र मोदींच्‍या शपथविधी सोहळ्याचे मालदीवच्‍या राष्‍ट्रपतींना निमंत्रण

मालदीवमधील भारताचे उच्च आयुक्त मुनू महावर यांनी डॉ मोहम्मद मुइज्जू यांना नरेंद्र मोदी यांच्‍या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले.
मालदीवमधील भारताचे उच्च आयुक्त मुनू महावर यांनी डॉ मोहम्मद मुइज्जू यांना नरेंद्र मोदी यांच्‍या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क ; नरेंद्र मोदी रविवार,९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मालदीवचे राष्‍ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू यांना देण्‍यात आले आहे. त्‍यांनी यांनी शपथविधी समारंभाचे निमंत्रण स्वीकारले असल्‍याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. दरम्‍यान, चीनशी सलगी वाढवत भारताविरोधात भूमिका घेणार्‍या मालदीवच्‍या नवीन सरकारची काही महिन्‍यानंतर भाषा बदलली आहे. मालदीव आणि भारत यांच्‍यातील ऐतिहासिक संबंधांचा दाखल देत भारतीयांना पर्यटनासाठी मालदीवमध्‍ये येवून आमच्‍या अर्थव्‍यवस्‍थेत योगदान द्यावे, असे आवाहन या देशाचे पर्यटन मंत्री इब्राहिम फैसल यांनी मार्च महिन्‍यात केले हाेते.

मालदीवमधील भारताचे उच्च आयुक्त मुनू महावर यांनी डॉ मोहम्मद मुइज्जू यांना नरेंद्र मोदी यांच्‍या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू यांनी शपथविधी समारंभाचे निमंत्रण स्वीकारले आहे.

PM मोदींच्‍या पोस्‍टवर मालदीवकडून अपमानास्पद टिप्पणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ जानेवारी रोजी सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म X हँडलवर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्राचीन लक्षद्वीप बेटांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते. भारतातील लक्षद्वीप बेटाला पर्यटकांनी भेट द्यावी, असे आवाहन त्‍यांनी यामाध्‍यमातून केले होते. मात्र मालदीवने याचा चुकीचा अर्थ काढला. मालदीवच्या तीन अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली. याची गंभीर दखल घेत  सेलिब्रेटींसह अनेक भारतीयांनी मालदीव सहल रद्द केली होती.

जानेवारीपर्यंत मालदीव हे भारतीयांसाठी सर्वाधिक आवडत्‍या पर्यटन केंद्रांपैकी एक होते. मात्र जानेवारीत मालदीवमधील राजकीय नेत्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावर आपेक्षार्ह टिपण्‍णी केली. याचा मोठी किंमत या देशाला मोजावी लागली आहे. आता भारतीय पर्यटकांसाठी मालदीव हे सहाव्‍या क्रमांकाची पसंती आहे. सोमवार ६ मे रोजी प्रकाशित झालेल्या sun.mv च्या अहवालानुसार, "गेल्या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत भारतातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 42 टक्क्यांनी घट झाली आहे. या वर्षाच्या सुरूवातीस मालदीवसाठी भारत हा क्रमांक एकच पर्यटन देणारा देश होता. आता तो सहाव्या स्थानावर घसरला आहे."

चीनशी सलगी वाढवत भारताविरोधात भूमिका घेणार्‍या मालदीवच्‍या नवीन सरकारची काही महिन्‍यात भाषा बदलली आहे. मालदीव आणि भारत यांच्‍यातील ऐतिहासिक संबंधांचा दाखल देत भारतीयांना पर्यटनासाठी मालदीवमध्‍ये येवून आमच्‍या अर्थव्‍यवस्‍थेत योगदान द्यावे, असे आवाहन या देशाचे पर्यटन मंत्री इब्राहिम फैसल यांनी मार्च महिन्‍यात केले हाेते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news