देशात एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणूक लागणार : भूपेश बघेल

देशात एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणूक लागणार : भूपेश बघेल

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्षभरात मोदी सरकार जाणार असून सहा महिने ते एका वर्षात देशात मध्यावधी निवडणूक लागणार आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तयार राहा, असे भाकीत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी केले. शुक्रवारी (दि. ८) एका कार्यक्रमात भूपेश बघेल यांनी हे वक्तव्य केले आहे.

भूपेश बघेल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. योगी आदित्यनाथ यांची खुर्ची डळमळीत आहे, भजनलाल शर्मा डगमगले आहेत आणि देवेंद्र फडणवीसही राजीनामा देत आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली, जे लोक दिवसातून तीन वेळा कपडे बदलायचे ते आता एकाच ड्रेसमध्ये तीन कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांना आता खाण्यापिण्याची, कपड्याची चिंता नाही, असे ते म्हणाले.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपला धडा शिकवला. पक्ष फोडणाऱ्या, निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणाऱ्या आणि धमक्या देणाऱ्यांना जनतेने चांगलाच धडा शिकवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news