BJP | भाजपच्या ‘या’ नेत्यांवर केंद्रीय मंत्रिमंडळ खातेवाटपाची जबाबदारी

BJP Leaders
BJP Leaders

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निकालानंतर आज (दि.६ जून) एनडीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत सुरु आहे.  या बैठकीत केंद्रीय मंत्रीमंडळ खातेवाटपासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे (BJP) मुख्य नेते नरेंद्र मोदी यांनी खातेवाटपासाठी ३ नेत्यांकडे जबाबदारी दिली असल्‍याचे वृत्त 'पुढारी न्‍यूज'ने दिले आहे.

अमित शहा, राजनाथ सिंह आणि जे. पी नड्डा या तीन नेत्यांवर केंद्रीय मंत्रिमंडळ खातेवाटपाची जबाबदारी जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. एनडीएमधील (BJP) सर्व नेत्यांची मागणी विचारात घेवूनच खातेवाटप केले जाईल. तसेच खात्यांची अपेक्षा आणि कोणती खाती देवू शकतो, यावर पुन्हा एकदा स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

भाजप पक्षश्रेष्ठी नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र बैठक घेणार असल्याची माहिती देखील या बैठकीतून समोर येत आहे.

हे ही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news