चंद्राबाबू नायडू यांचा शपथविधी लांबणीवर!, आता १२ जून मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेण्‍याची शक्‍यता

चंद्राबाबू नायडू यांचा शपथविधी लांबणीवर!, आता १२ जून मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेण्‍याची शक्‍यता

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचा आंध्र प्रदेशचे मुख्‍यमंत्री म्‍हणून होणारा शपथविधी १२ जूनपर्यंत लांबणीवर पडला आहे, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.

आंध्र प्रदेश मुख्‍यमंत्रीपदी चंद्राबाबू नायडू रविवार, ९ जून रोजी शपथ घेतील, अशी शक्‍यता होती. मात्र आता त्‍याचा शपथविधी सोहळा १२ जूनपर्यंत ढकलण्यात आला आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे शनिवार, ८ जून रोजी शपथ घेण्‍याची शकय्‍ता आहे. त्‍यामुळे आता चंद्रबाबू नायडू यांच्‍या शपथविधी सोहळा कार्यक्रमात बदल करण्‍यात आल्‍याचे मानले जात आहे.

नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला. राष्ट्रपतींनी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला. तसेच नवीन सरकार कार्यभार स्वीकारेपर्यंत नरेंद्र मोदी यांना पदावर कायम राहण्याचे आवाहन केले.
तेलगू देसम पार्टी हा भाजप प्रणित एनडीएममध्‍ये दुसर्‍या क्रमाकांचा पक्ष ठरला आहे. त्‍यामुळे चंद्राबाबू नायडू आता किंगमेकरच्‍या भूमिकेत आहेत. त्‍याचबरोबर एनडीएमध्‍ये बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांचीही भूमिका महत्त्‍वपूर्ण राहणार आहे.

तेलगू देसम पार्टी लोकसभा अध्‍यक्षपदासाठी आग्रही

लोकसभा निवडणूक निकालानंतर आम्‍ही एनडीएसोबतच राहणार, असे चंद्रबाबू नायडू यांनी बुधवारी स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान,चंद्राबाबू नायडू हे नवीन सरकारमध्‍ये लोकसभा अध्‍यक्षपदासाठी आग्रही असल्‍याची चर्चा आहे. तसेच तेलगू देसम पार्टी सात ते आठ कॅबिनेट आणि एक राज्‍यमंत्रीपदासाठी आग्रही असल्‍याचेही मानले जात आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news