Uttar Pradesh Lok Sabha : भाजपला रोखणारे अखिलेश यादव यांचे PDA समीकरण काय आहे?

अखिलेश यादव
अखिलेश यादव

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीने भारतीय जनता पक्षाला (भाजप) वेसण घातल्याने भाजपला लोकसभा निवडणुकांत बहुमत मिळू शकलेले नाही. समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नव्याने सोशल इंजिनिअरिंग करत उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh Lok Sabha) पीडीए फॉर्म्युला आकारास आणला आहे. पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक हे पीडीए समीकरण भाजपला चांगलेच महागात पडल्याचे सध्याचे चित्र आहे.

समाजवादी पक्षाच्या निवडून आलेल्या उमेदवारात ८६ टक्के उमेदवार ओबीसी, दलित आणि मुस्लिम आहेत. समाजावादी पक्षाचे ३७ खासदार उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh Lok Sabha) निवडून आले आहेत. यातील २० ओबीसी, आठ दलित तर चार मुस्लिम आहेत. तर ब्राह्मण, वैश्य, भूमिहार या उच्च जातीतील प्रत्येक १ आणि ठाकूर समाजातील दोन खासदार निवडून आले आहेत.

विशेष बाब म्हणजे सर्वसाधारण मतदारसंघात अनुसुचित जातींतील उमेदवार उभे करण्याची अखिलेश यादव यांनी कल्पनाही राबवली. फैजाबाद या मतदारसंघातून अखिलेश यांनी अनुसुचित जातीतील उमेदवार दिले होते, ते निवडून आले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने सहा जागा जिंकल्या यात एक ओबीसी, एक दलित, एक मुस्लिम यांचा समावेश आहेत. उरलेल्या तीन खासदारांत एक ब्राह्मण, एक भूमिहार आणि एक पंजाबी आहेत. तर दुसरीकडे भाजपने वरच्या जातीतील नेत्यांना उमेदवारी (Uttar Pradesh Lok Sabha) देण्याला पसंती दिली होती.

हे ही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news