कंगनाने मोदींचा फोटो शेअर करून पुन्हा वेधलं लक्ष, या फोटोची खास बात आहे तरी काय?

कंगनाने नरेंद्र मोदी यांचा ग्रुप फोटो शेअर केला आहे
कंगनाने नरेंद्र मोदी यांचा ग्रुप फोटो शेअर केला आहे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकलेली कंगना रनौतने हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून निवडणूक लढवली होती. कंगनाने आपल्या विजयावर प्रतिक्रिया देत म्हटले होते की, पीएम मोदी यांना या विजयाचे श्रेयजाते. आता कंगना रनौतने पुन्हा एकदा पोस्ट शेअर केली आहे. आता या फोटोची सगळीकडे चर्चा होताना दिसतेय कंगना रनौतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नरेंद्र मोदी, चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा ग्रुप फोटो शेअर केला आहे.

अधिक वाचा –

कंगना रनौतच्या पोस्टमध्ये काय आहे?

एनडीएने पंतप्रधान निवासस्थानी एका बैठकीत सर्वसंमतीने मोदींना आपला नेता म्हणून निवडण्याचा प्रस्ताव पारित केला. दरम्यान, कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर NDA च्या सर्व नेत्यांच्या मीटिंग नंतर ग्रुप फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिलं- 'सपने नहीं हकीकत बुनते हैं, तभी तो सब मोदी चुनते हैं। #ModiAgain।'

अधिक वाचा –

कंगना रनौतचा दमदार विजय

लोकसभेच्या निवडणुकीत कंगना रनौतने देखील राजकीय जगतात दमदार एन्ट्री घेतली. कंगनाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभेची जागा जिंकली. कंगनाने आपला प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांना ७४ हजार अधिक मते मिळवून पराभूत केले. लोकसभा निवडणुकीत आपल्या पहिल्या विजयाला कंगनाने एक्स अकाऊंटवर देखील प्रतिक्रिया दिली. हा 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासाचा विजय' असल्याचे सांगितले. कंगनाने पीएम मोदींचा फोटो एक कोलाज शेअर करत म्हटले, "हे समर्थन, हे प्रेम आणि विश्वासासाठी सर्व मंडीवासियांना मनापासून आभार. हा आपल्या सर्वांचा विजय आहे, पंतप्रधान मोदी आणि भाजपावरील विश्वासाचा विजय आहे. हा मंडीच्या सन्मानाचा विजय आहे.."

अधिक वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news