अमूलच्या दूध विक्री दरात आजपासून २ रूपयांची वाढ

अमूलच्या दूध विक्री दरात आजपासून २ रूपयांची वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजपासून (दि.३) देशभरात अमूलच्या दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता अमूल गोल्डची किंमत ६४ रुपये प्रतिलिटरवरून ६६ रुपये प्रतिलिटर होणार आहे. तर अमूल टी स्पेशलची किंमत ६२ रुपयांवरून ६४ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढणार आहे.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन म्हणजे अमूलने सांगितले की, वाढलेल्या किमती या केवळ ३-४ टक्के वाढल्या आहेत, जे अन्नपदार्थाच्या महागाईपेक्षा खूपच कमी आहेत. फेब्रुवारी २०२३ पासून किमती वाढल्या नव्हत्या, त्यामुळे वाढ आवश्यक होती. दूध उत्पादन आणि ऑपरेशन खर्चात वाढ झाल्यामुळे ही किंमत वाढल्याचा दावा अमूलने केला आहे. गेल्या वर्षी अमूलने शेतकऱ्यांच्या दरात सरासरी ६ ते ८ टक्क्यांनी वाढ केली होती. अमूलच्या धोरणानुसार, ग्राहकांनी भरलेल्या १ रुपयांपैकी ८० पैसे दूध उत्पादकाला जातात.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news