मालीवाल मारहाण प्रकरण : बिभव कुमार यांना तीस हजारी न्‍यायालयाचा झटका, जामीन अर्ज फेटाळला | पुढारी

मालीवाल मारहाण प्रकरण : बिभव कुमार यांना तीस हजारी न्‍यायालयाचा झटका, जामीन अर्ज फेटाळला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी स्‍वीय सहायक बिभव कुमार यांना स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी आज (दि.२७) तीस हजारी न्यायालयातून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्‍यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तीस हजारी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बिभव कुमार उच्च न्यायालयात जाणार आहेत. सध्या ते न्‍यायालयीन कोठडीत आहेत.

स्वाती बळजबरीने मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसल्या होत्या

बिभवच्या वकिलाने सांगितले की, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी स्वाती मालीवाल यांना बाहेर थांबण्यास सांगितले; पण ‘तुम्ही मला असे रोखू शकत नाही’ असे म्‍हणत त्‍यांनी केजरीवाल यांच्‍या सरकारी निवासस्‍थानात प्रवेश केला. बिभव यांनी कोणाच्या सांगण्यावरून तुम्‍ही आत आला, अशी विचारणा केली. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचीही जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्‍यांनी हा सवाल केल्‍याचेही बिभव यांनी सांगितले.

न्‍यायालयात स्वाती मालीवालांच्‍या अश्रूंचा बांध फुटला

दिल्‍लीतील तीस हजारी न्‍यायालयात बिभव कुमार यांच्‍या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी आज स्‍वाती मालीवाल यांना आपल्‍या अश्रूला वाट करुन दिली. त्‍या धाय माकलून रडल्‍या. यावेळी दिल्लीच्या माजी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तीस हजारी न्यायालयात सांगितले की, “बिभव कुमारला जामीन मंजूर झाला तर “माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे”.

हेही वाचा : 

Back to top button