मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मान्सूनची वाटचाल दुसऱ्या दिवशी वेगाने अरबी समुद्राच्या दिशेने सुरू झाली आहे. तो लवकरच आग्नेय अरबी समुद्रात येईल. सोमवारी मान्सूनने आग्नेय अरबी समुद्राकडे कूच करीत मालदीव, कोमोरिन, बंगालचा उपसागर, अंदमान-निकोबार बेटांत प्रगती केली. त्यामुळे दक्षिण भारतात अतिवृष्टी सुरू झाली आहे.
२२ मे रोजी नैऋत्य बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. २४ रोजी त्याचे अतितीव्र कमी दाबाच्या पट्टयात रूपांतर होत आहे. त्यामुळे मान्सून वाऱ्यांचा वेग वाढणार आहे. दक्षिण भारतात मान्सूनचे वेगाने आगमन होताना दिसत असतानाच उत्तर भारतात आगामी पाच दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात २१ ते २६ मेदरम्यान हलका ते मध्यम पावसाचा अंदाज असून, उष्ण व दमट हवामान तयार होऊन उष्णतेची लाटही तीव्र होईल. पारा ४० ते ४२ अंशांवर जाईल, असा अंदाज आहे.
हेही वाचा :