Mother’s’ day : ‘ती आई होती म्हणूनी घनव्याकूळ मीही रडलो… : थोरामोठ्यांच्या कवितेतील आई  | पुढारी

Mother's' day : ‘ती आई होती म्हणूनी घनव्याकूळ मीही रडलो... : थोरामोठ्यांच्या कवितेतील आई 

पुढारी ऑनलाईन डेस्क : आईचे प्रेम, माया, वात्सल्य, दिलेलं पाठबळ यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही;   पण आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात एक दिवस (Mother’s’ day) साजरा केला जातो. तो म्हणजे मे महिन्याचा येणारा दूसरा रविवार हा ‘मदर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या आईबद्दल व्यक्त होत असतो. कोणी शुभेच्छा, कोणी भेटवस्तू, कोणी कविता, तर कोणी पत्रातून व्यक्त होत असते. 

Mother’s’ day : थोरामोठ्यांच्या कवितेतील आई

माणूस आपल्या आईप्रती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्यक्त होत असतो. कोण बोलून व्यक्त होतो. कोणी लिहितो; मग ती कविता असो, ती चारोळी असो किंवा तो भलामोठा लेख असो. आज आपण  ‘मदर्स डे निमित्त अनेक मान्यवरांनी आपल्या लेखणीतून आई नावाच्या रसायनाबद्दल खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.  हे पाहणार आहोत. 

तुम्हाला कवी फ.मुं. शिंदेची कविता आठवते का?

आई एक नाव असतं                                                                                                                                                घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!                                                                                                                                  सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही..

फ.मुं म्हणतात ते खरचं आहे. आई हे असं गाव आहे जिथे आपल्याला रमायला आवडतं प्रत्येकाला.  आईच्या प्रेमाला कितीही उपमा दिली तरी ती कमीच पडेल, अशी आई असते.

Mother’s Day 2022: In India

आई हा आपला पहिला गुरु जिथे आपल्याला जगाची ओळख होते. श्यामची आई लिहणाऱ्या साने गुरुजींच्या शब्दात सांगायचं तर,        ‘आई माझा गुरू : आई माझे कल्पतरू, आईचे प्रेम आकाशाहून मोठे आणि सागराहूनही खोल आहे.

 शांताबाई शेळके यांची एक छान कविता आहे. (Mother’s’ day) ती प्रचंड गाजली. या कवितेत लहान मुलाने आपली आई कशी आहे हे छान सांगितले आहे.
ते मुलं म्हणतं, आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी

औषधावर दिलेली लिमलेटची गोळी
आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखर खडा
शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा
आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात
मेतकूट कालवलेला मऊ तूपभात
आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र
सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र

माणिक सीताराम गोडघाटे म्हणजेच कवी ग्रेस यांची आईबद्दलची एक कविता जी आजही मनात घर करुन आहे, ती कविता  म्हणजे,

‘ती आई होती म्हणूनी
घनव्याकूळ मीही रडलो,
त्यावेळी वारा सावध
पाचोळा उडवीत होता,
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता!’

हेही वाचलंत का? 

Back to top button