Chhattisgarh encounter | छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत ७ नक्षलवादी ठार | पुढारी

Chhattisgarh encounter | छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत ७ नक्षलवादी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत ७ नक्षलवादी ठार झाले आहेत. या घटनेची पुष्टी पोलिस अधिकाऱ्यांनी केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा रिझर्व्ह गार्ड (DRG) आणि स्पेशल टास्क फोर्स (STF) यांच्या संयुक्त सुरक्षा पथकाने ही कारवाई केली. (Chhattisgarh encounter) याबाबतचे वृत्त ANI ने दिले आहे.

आतापर्यंत ७ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. यात २ महिलांचा समावेश आहे. चकमकीच्या ठिकाणाहून एक एके ४७ सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी शोध सुरू असल्याची माहिती बस्तरचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिली आहे.

पी सुंदरराज पुढे म्हणाले, “आज नारायणपूर कांकेर सीमा भागात अबुझमाडच्या जंगलात नक्षलवादी आणि डीआरजी नारायणपूर, एसटीएफ पथकात चकमक उडाली. या ठिकाणी अद्याप चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यात २ महिला आहेत. चकमकीच्या ठिकाणाहून एके ४७ सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.”

“आज सकाळपासून नारायणपूर-कांकेर सीमा भागातील अबूझमाड येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे,” असे एका अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना सांगितले. “नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत ७ नक्षलवादी ठार झाले आहेत आणि इतर अनेक जखमी झाले आहेत. सर्व सुरक्षा कर्मचारी सुरक्षित असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

सर्व ७ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी ५ एप्रिल रोजी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता. आता पुन्हा सुरक्षा दलांनी एक मोठी कारवाई केली आहे.

हे ही वाचा ;

 

Back to top button