निवडणूक प्रचारात डीप फेकचा वापर; भाजपचे निवडणूक आयोगाला निवेदन | पुढारी

निवडणूक प्रचारात डीप फेकचा वापर; भाजपचे निवडणूक आयोगाला निवेदन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांकडून सोशल मीडियावर ‘डीप फेक’ तंत्रज्ञानाचा वापर करून, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्याच्या वाढत्या प्रकारावर आळा घालण्यासाठी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला निवेदन दिले आहे.

निवडणूक प्रचारात डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींचे मोठ्याप्रमाणात उल्लंघन केले जात आहे. खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने त्याचा मतदारांवर प्रभाव पडत आहे. त्यामळे या प्रकारावर आळा घालण्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाला निवेदन देण्यात आल्याची माहिती भाजपने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

अभिनेता रणवीर सिंग, आमिर खान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, समाजवादी पक्षाचे सरचिटणीस लालजी वर्मा, मध्यप्रदेशातील काँग्रेस दिनेश लाल यादव यांच्या नावाने खोटी व दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारावर आळा घालण्यासाठी एक्स, फेसबूक, इंस्टाग्राम, युट्यूब आणि इतर माध्यमांना अशा पोस्टवर नियंत्रण आणणारी यंत्रणा अधिक सक्रिय करण्याची मागणी भाजपने या निवदेनातून केली आहे.

हेही वाचा

उत्तर मध्य मुंबईतील भाजपचे धक्कातंत्र पाहून नाशिकमध्ये वाढली धाकधूक, तिन्ही पक्षांच्या इच्छुकांकडून देव पाण्यात

कोल्हापूर : विहिरीत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

छ. संभाजीनगर: बोटावर शाई दाखवा, तपासणीत ५० टक्के सवलत मिळवा; मतदान वाढीसाठी डॉक्टर सरसावले

Back to top button