माेठी बातमी : हेमंत सोरेन अटक प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाची ‘ईडी’ला नाेटीस | पुढारी

माेठी बातमी : हेमंत सोरेन अटक प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाची 'ईडी'ला नाेटीस

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर आज (दि.२९ एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली आहे. तसेच साेरेन यांच्‍या अटक प्रकरणी याचिकेवर सुनावणीस सहमती दर्शवत या प्रकरणी ६ मे राेजी पुढील सुनावणी हाेईल, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले.

जमीन घाेटाळा प्रकरणी ‘ईडी’ने हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अटक केली होती. त्‍यांच्‍या जामिनावरील याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल देण्यास केलेल्या विलंबाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तसेच, मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्या अटकेला आव्हान दिले होते. आज सर्वोच्‍च न्‍यायालयाचे  न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांचा खंडपीठासमाेर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली आहे. साेरेन यांच्‍या अटक प्रकरणी याचिकेवर सुनावणीस परवानगी देत पुढील सुनावणी ६ मे राेजी हाेईल, असे खंडपीठाने स्‍पष्‍ट केले .


काय आहे प्रकरण?

हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. माजी मुख्यमंत्री सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सोरेन यांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीला आणखी एका आठवड्याची मुदत दिली होती. यापूर्वी 27 एप्रिल रोजी रांची येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. हेमंत सोरेन यांचे काका राम सोरेन यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. सोरेनने आपल्या काकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडे 13 दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता. याविराेधात हेमंत साेरेन यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली हाेती.


हेही वाचा : 

 

Back to top button