MP Lok Sabha : “तुमचं पक्षात स्‍वागत” : इंदूरमध्‍ये काँग्रेस उमेदवाराच्‍या माघारीनंतर भाजप नेत्‍याची पाेस्‍ट | पुढारी

MP Lok Sabha : "तुमचं पक्षात स्‍वागत" : इंदूरमध्‍ये काँग्रेस उमेदवाराच्‍या माघारीनंतर भाजप नेत्‍याची पाेस्‍ट

पुढारी ऑनलाईन डेस्क: गुजरातप्रमाणेच मध्य प्रदेशातही काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इंदूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. इतकंच नाही तर काँग्रेस सोडल्यानंतर अक्षय बम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी ही माहिती दिली आहे. (MP Lok Sabha)

काँग्रेसचे इंदूरचे उमेदवार अक्षय कांती बंब यांनी आज (दि. २९ एप्रिल )आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी बंब यांचे छायाचित्र पोस्ट केले. तसेच “भाजप काँग्रेसचे इंदूरचे उमेदवार अक्षय कांती बंब यांचे स्वागत ,” असे आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे.

इंदूर लोकसभा जागेसाठी 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. 29 एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज काँग्रेसचे इंदूरचे उमेदवार अक्षय कांती बंब यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यानंतर ते थेट  मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्‍या कारमध्‍ये बसले. विजयवर्गीय यांनी बंब यांचे छायाचित्र पोस्ट करत ” काँग्रेसचे इंदूरचे उमेदवार अक्षय कांती बंब यांचे स्वागत आहे.” अशी पाेस्‍ट केली. यामुळे मध्‍य प्रदेश काँग्रेसमध्‍ये खळबळ उडाली आहे.

इंदूरमध्ये 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी पूर्ण होणार आहे.

Back to top button