Stock Market Updates | सेन्सेक्स ५५० अंकांनी वाढला, निफ्टी २२,५०० वर, ‘हे’ शेअर्स तेजीत | पुढारी

Stock Market Updates | सेन्सेक्स ५५० अंकांनी वाढला, निफ्टी २२,५०० वर, 'हे' शेअर्स तेजीत

पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेत आणि आयसीआयसीआय बँक शेअर्समधील तेजीमुळे सोमवारी (दि.२९ एप्रिल) सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ५५० अंकांनी वाढून ७४,२५० वर पोहोचला. तर निफ्टी २२,५०० वर गेला. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत. तर एचसीएल टेक, आयटीसी, विप्रो, एम अँड एम हे शेअर्स घसरले आहेत.

निफ्टीवर बीपीसीएल, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, टाटा स्टील, एसबीआय लाईफ हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले आहे. तर अपोलो हॉस्पिटलचा शेअर्स ६ टक्क्यांनी घसरून ५,८४९ रुपयांपर्यंत खाली आला. त्याचबरोबर एचसीएल टेक, श्रीराम फायनान्स, बजाज ऑटो, एचडीएफसी लाईफ हे शेअर्सही घसरले आहेत.

दरम्यान, खासगी क्षेत्रातील येस बँकेचे शेअर्सने सोमवारी बीएसईवर ५ टक्क्यांनी वाढून २७.५० रुपयांवर पोहोचले. (YES Bank Share Price)

भारतातील दुसऱ्या क्रमांकाची खासगी बँक आयसीआयसीआय बँकेचा (ICICI Bank) शेअर्स २ टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहे. ICICI Bank ने तिमाही नफा आणि मार्जिनमध्ये अपेक्षेपेक्षा १७.४ वाढ नोंदवल्यानंतर त्यांचे शेअर्स वधारले आहेत. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

 

Back to top button