१५ डिसेंबरपासून आंतरराष्‍ट्रीय विमानसेवा सुरु होण्‍याची शक्‍यता कमीच | पुढारी

१५ डिसेंबरपासून आंतरराष्‍ट्रीय विमानसेवा सुरु होण्‍याची शक्‍यता कमीच

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसंस्‍था

कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनमुळे आतंरराष्‍ट्रीय विमानसेवा सुरु करण्‍याच्‍या निर्णय लांबणीवर पडण्‍याची शक्‍यता आहे. १५ डिसेंबरपासून आंतरराष्‍ट्रीय विमानसेवा सुरु करण्‍याचा सरकारचा विचार होता. मात्र आता याची अंमलबजावणी लांबणीवर पडण्‍याची शक्‍यता आहे.

कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले रुग्‍ण दक्षिण आफ्रिकेमध्‍ये आढळले आहेत. यामुळे आम्‍ही परिस्‍थितीवर नजर ठेवून आहोत. असे नागरी उड्‍डाण मंत्रालयाच्‍या सूत्रांनी सांगितले. त्‍यामुळे आता १५ डिसेंबरपासून सुरु होणारे आंतरराष्‍ट्रीय विमानसेवा
लांबणीवर पडण्‍याची शक्‍यता आहे.

कोरोना संसर्ग रोखण्‍यासाठी केंद्र सरकारने २२ मार्च २०२० पासून आंतरराष्‍ट्रीय प्रवासी विमान सेवा बंद केली होती. या स्‍थगितीची मुदत ३० नोव्‍हेंबर २०२१पर्यंत वाढवला होता. सध्‍या आतंरराष्‍ट्रीय उड्‍डाणांसाठी भारतांची २५ हून अधिक देशांसोबत ‘एअर बबल’ व्‍यवस्‍था सुरु आहे. यानुसार दोन देशांमधील विमान कंपन्‍या कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन करुन एकमेकांच्‍या भूप्रदेशात विमानसेवा देतात.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button