पुढारी ऑनलाईन डेस्क: हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून अभिनेत्री कंगना रणौत भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. कंगनाने प्रचारादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर टीका केली होती. या टीकेला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कंगना आमच्याबद्दल बोलत आहे, याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. पण मी तिच्या मूर्खपणावर उत्तर द्यावे, असे तुम्हाला वाटते का?, असा सवाल करून माझे वडील जिवंत असतानाही सोनिया गांधींना शिवीगाळ केली जात होती, असे त्या म्हणाल्या. Priyanka Gandhi on Kangana Ranaut
प्रियंका गांधी यांनी आज (दि.१७) युपीतील सहारनपूर येथे रोड शो केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, 'मोदीजींनी हमी दिली होती की, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. आलेत का? २ कोटी नोकऱ्या देणार, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते, ते मिळाले का? देशभक्ती म्हणजे काय हे सरकारने आम्हाला शिकवू नये, आमच्या कुटुंबातील लोक शहीद झाले आहेत. आणि खरा धर्म काय आहे, हे आम्हाला चांगले माहीत आहे, असे त्या म्हणाल्या. Priyanka Gandhi on Kangana Ranaut
आम्ही सत्तेची पूजा करत नाही, तर शक्ती आणि सत्याची पूजा करतो. आज जे सत्तेत आहेत ते सत्तेचे नाही. तर सत्तेचे पूजक आहेत. खरा राम भक्त तोच असतो, जो सत्याच्या मार्गावर चालतो, मग तो कोणत्याही धर्माचा असो.
पंतप्रधान मोदी यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल बोलू नये, आम्हाला माहीत आहे की, त्यांचा धर्म कोणता होता. या देशाचा देशभक्तीचा धर्म आहे. देशासाठी शहीद होणे, हा त्यांचा धर्म होता. इंदिरा हिंदू धर्म मानत होत्या, आम्ही मानतो, काँग्रेस पक्ष मानतो. आणि महात्मा गांधी मानत होते. त्या धर्माच्या आधारे आमचे आंदोलन सुरू आहे, तो सत्याचा धर्म आहे, अशा त्या म्हणाल्या.
हेही वाचा