Lok Sabha election 2024: प्रियंका गांधी ‘रायबरेली’तून नाही, तर ‘येथून’ लोकसभा निवडणुक लढवणार?

Lok Sabha election 2024: प्रियंका गांधी ‘रायबरेली’तून नाही, तर ‘येथून’ लोकसभा निवडणुक लढवणार?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतात या वर्षी लोकसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला करत आहेत. राजकीय पक्ष उमेदवारांच्या नावांची यादी घोषित करत आहेत. भाजपची यादी बाहेर आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली. कारण भाजपने १९५ उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. दरम्यान आता काँग्रेस पक्षाच्या सरचिटणी प्रियांका गांधी-वढेरा रायबरेलीतून नव्हे, तर 'दमण-दीव'मधून निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता दमण आणि दीवमधील काँग्रेसचे अध्यक्ष केतन पटेल यांनी वर्तवली आहे. (Lok Sabha election 2024)

Lok Sabha election 2024: हायकमांडने डेटा गोळा करण्यास सांगितले

ते म्हणाले, 'प्रियांका गांधी-वढेरा यावेळी दमण आणि दीवमधून निवडणूक लढवू शकतात. मी या प्रस्तावाचे स्वागत करतो. काँग्रेस हायकमांडने आम्हाला काही डेटा गोळा करण्यास सांगितले आहे. मात्र, शेवटी पक्षच निर्णय घेईल, असे देखील केतन पटेल यांनी म्हटले आहे. (Lok Sabha election 2024)

रायबरेली सर्वात योग्य 'जागा'

प्रियांका गांधी-वढेरा निवडणूक लढवणार असल्याच्या अनेक वेळा चर्चा झाल्या, मात्र त्या अद्याप उमेदवार म्हणून मैदानात आलेल्या नाहीत. संघटनेतील सरचिटणीसपद कायम ठेवत पक्षाने त्यांना उत्तर प्रदेश प्रभारीपदाच्या जबाबदारीतून नुकतेच मुक्त केले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्या उमेदवार होणार हे स्पष्ट संकेत आहेत. त्या रायबरेलीतून निवडणूक लढवू शकतात, असे बोलले जात होते. मात्र आता 'दमण-दीव'बाबत अटकळ बांधली जात आहे.

सोनिया गांधी रायबरेलीमधून अजिंक्य

मात्र, सोनिया गांधींव्यतिरिक्त इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांनीही रायबरेलीतून निवडणूक लढवली आणि लोकसभेवर गेले. या संदर्भात, रायबरेली प्रियांकासाठी सर्वात योग्य जागा असू शकते. 1999 च्या लोकसभा निवडणुकीनंतर 2004, 2006 (पोटनिवडणूक), 2009, 2014 आणि 2019 मध्ये जिंकलेल्या सोनिया गांधी रायबरेलीमधून अजिंक्य आहेत.

राजकारणापासून दूर राहून काँग्रेसचा प्रचार केला

राजकीय आघाडीबद्दल बोलायचे झाले तर, सुरुवातीला प्रियंका गांधी त्यापासून दूर राहिल्या. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यांची आई सोनिया गांधी यांचा प्रचार निश्चितपणे सांभाळला. पण राजकारणात सक्रिय झाल्या नाहीत. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी प्रचार केला पण तो अमेठी-रायबरेलीपुरता मर्यादित होता.

त्यांनी अद्याप कोणतीही निवडणूक लढलेली नाही

प्रियांका गांधी यांनी 2009 मध्ये अशाच पद्धतीने काँग्रेसचा प्रचार केला होता. परंतु अधिकृतपणे काँग्रेस पक्षाशी संबंधित नव्हता. 2012 मध्ये काँग्रेसने त्यांना स्टार प्रचारक म्हणून उभे केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा काँग्रेसला स्टार प्रचारक म्हणून पाठिंबा दिला. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मर्यादित क्षमतेत काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला. पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना पूर्व उत्तर प्रदेशचे सरचिटणीस बनवले आणि त्या सक्रिय राजकारणात आल्या. मात्र, प्रियांका गांधी यांनी अद्याप कोणतीही निवडणूक लढलेली नाही.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news