Ram Navami 2024 | रामनवमी निमित्त अयोध्येत रामलल्लाचा दिव्य अभिषेक, पाहा मनमोहक फोटो आणि व्हिडिओ | पुढारी

Ram Navami 2024 | रामनवमी निमित्त अयोध्येत रामलल्लाचा दिव्य अभिषेक, पाहा मनमोहक फोटो आणि व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन डेस्क : रामनवमी निमित्ताने आज बुधवारी (दि.१७) अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात रामलल्लाचा दिव्य अभिषेक करण्यात आला. या विधीचे मनमोहक फोटो श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र यांनी त्यांच्या X अकाऊंटवर शेअर केले आहेत. आज रामनवमी निमित्त अयोध्येत दुपारी १२ वाजता रामलल्लाचा सूर्यतिलक विधी होईल. अभिजित मुहूर्तावर हा कार्यक्रम असून वाल्मीकी रामायणाप्रमाणे त्रेतायुगात याचवेळी व मुहूर्तावर प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता. या निमित्ताने रामलल्लाना दिव्य अलंकारांनी सजवण्यात आले आहे. (Ram Navami 2024)

Image

अयोध्येतील सूर्यतिलकप्रसंगी नऊ शुभ योग असून तीन ग्रहांची स्थिती त्रेतायुगात होती, तशीच यावेळीही असेल. दुपारी १२ वाजता सूर्यतिलक होईल तेव्हा केदार, गजकेसरी, पारिजात, अमला, शुभ, वाशी, सरल, काहल आणि रवियोग घडतील. या नऊ शुभ योगांत रामलल्लांचा सूर्यतिलक होईल. रामजन्मप्रसंगी सूर्य आणि शुक्र आपल्या उच्च राशीत होते; तर चंद्र स्वतःच्या राशीत उपस्थित होता. या वर्षीही योगायोगाने असेच घडत आहे. ग्रहांची ही दशा देशासाठी शुभ संकेत आहे, असे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे.

Image

सूर्यतिलक समारंभ आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होईल. शिखरावर रिफ्लेक्टर यंत्रणा बसविण्यात आली असून त्याद्वारे सूर्याची किरणे प्रवास करतील व गर्भगृहात रामलल्लाच्या कपाळावर पडतील. सूर्यतिलक स्पष्टपणे दिसावा व रामलल्लालाही उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कपाळावर चंदनाचा लेप लावण्यात येणार आहे. (Ram Navami 2024)

Image

२० तास दर्शन रामनवमीला

२० तास मंदिर खुले राहणार आहे. ब्रह्म मुहर्तावर पहाटे ३.३० वाजता मंगलारती झाली. यानंतर रात्री ११ पर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल.

श्रीरामपूजेचा अडीच तासांचा मुहूर्त

श्रीराम जन्मानिमित्त पूजेची प्रदीर्घ परंपरा भारतात आहे. पूजेसाठी सकाळी ११.०५ ते दु‌पारी १.३५ वाजेपर्यंत असा जवळपास अडीच तासांचा मुहूर्त आहे.

हे ही वाचा :

Back to top button