Delhi excise policy case: ‘ही CBI कोठडी नाही, तर भाजपची कोठडी’; के. कवितांचा हल्लाबोल | पुढारी

Delhi excise policy case: 'ही CBI कोठडी नाही, तर भाजपची कोठडी'; के. कवितांचा हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क: तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या आणि BRS आमदार के. कविता या सध्या दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणात अटकेत आहेत. त्या सध्या सीबीआयच्या ताब्यात असून, दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने मंगळवार २३ एप्रिलपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. दरम्यान आज त्यांनी ३ दिवसाची सीबीआय कोठडी सपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. तेव्हा माध्यमांशी बोलताना ही ‘CBI नाही, तर भाजपची कोठडी’ असल्याचा हल्लाबोल के.कविता यांनी केला. (Delhi excise policy case)

बीआरएस नेते के कविता यांनी म्हटले आहे की,”ही सीबीआय कोठडी नाही, तर ही भाजपची कोठडी आहे. भाजप बाहेर जे काही बोलत आहे, सीबीआय आत तेच विचारत आहे, गेल्या २ वर्षांपासून पुन्हा पुन्हा तेच विचारत आहे, यात नवीन काही नाही”, असे देखील के.कविता यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. बीआरएस नेत्या के.कविता यांना ईडीने दिल्ली मद्य धोरण घोटाळ्या संबंधित ११ एप्रिल रोजी अटक केली होती. त्यानंतर १२एप्रिल रोजी त्यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली, जी आज १५ एप्रिल रोजी संपली. आज पुन्हा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत मंगळवार २३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. (Delhi excise policy case)

सीबीआयने के. कविता यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयाने त्यांना केवळ ९ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयपूर्वी, के. कविता यांना ईडीने दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. (Delhi excise policy case)

हे ही वाचा:

Back to top button