K Kavitha News: ‘हे मनी लॉन्ड्रिंग नाही तर राजकीय लॉन्ड्रिंग’; के. कविता यांचा सत्ताधारी, ईडीवर हल्लाबोल | पुढारी

K Kavitha News: 'हे मनी लॉन्ड्रिंग नाही तर राजकीय लॉन्ड्रिंग'; के. कविता यांचा सत्ताधारी, ईडीवर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधी मनी लॉड्रींग प्रकरणात ईडीने बीआरएस नेत्या के.कविता यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान राऊस अव्हेन्यू कोर्टाने त्यांना आज २६ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. के कविता यांना तिच्या ईडी कोठडीच्या शेवटी राऊस अव्हेन्यू न्यायालयात आणले, यावेळी ‘हि मनी लॉन्ड्रिंग केस नाही तर राजकीय लॉन्ड्रिंग केस आहे’ असा आरोप करत तपास यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. (K Kavitha News)

पुढे के.कविता राऊस अव्हेन्यू न्यायालयात पोहचात माध्यमांसमोर त्या आल्या. यावेळी त्या म्हणाल्या, दिल्ली मध्य धोरण घोटाळा प्रकरण एक बनावट आणि खोटा खटला आहे. आम्ही स्वच्छ प्रतिमेने बाहेर येऊ, असा विश्वास देखील के. कविता यांनी व्यक्त केला आहे. (K Kavitha News)

बीआरएस नेत्या के. कविता यांची राऊस अव्हेन्यू कोर्टाने ईडीकडे दिलेली कोठडी आज संपत आहे. दरम्यान ईडीने या ईडी कोठडीच्या कालावधीत आम्ही त्यांच्या रिमांड कालावधीत त्यांचा जबाब नोंदवला, त्यांची चौकशी केली तसेच अनेक व्यक्ती आणि डिजिटल रेकॉर्डसह त्याची विचारपूरस केल्याचे राऊस अव्हेन्यू कोर्टासमोर सांगितले. (K Kavitha News)

हे ही वाचा:

Back to top button