Lok Sabha Election 2024 : ‘तृणमूल’च्‍या कार्यकर्त्यासोबत अधीर रंजन यांचा ‘राडा’, व्‍हिडिओ व्‍हायरल

बेहरामपूर येथील काँग्रेसचे उमेदवार अधीर रंजन चौधरी यांनी आमच्‍या कार्यकर्त्याला धक्‍काबुक्‍की केली, असा दावा करणारा व्‍हिडिओ तृणमूल काँग्रेसने शेअर केला आहे.
बेहरामपूर येथील काँग्रेसचे उमेदवार अधीर रंजन चौधरी यांनी आमच्‍या कार्यकर्त्याला धक्‍काबुक्‍की केली, असा दावा करणारा व्‍हिडिओ तृणमूल काँग्रेसने शेअर केला आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालमध्‍ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. राज्‍यातील बेहरामपूर येथील काँग्रेसचे उमेदवार अधीर रंजन चौधरी यांनी आमच्‍या कार्यकर्त्याला धक्‍काबुक्‍की केली, असा दावा करणारा व्‍हिडिओ तृणमूल काँग्रेसने शेअर केला आहे. हे लज्जास्पद कृत्य सर्वांनी पाहावे, असे आवाहनही मतदारांना केले आहे. या घटनेनंतर राज्‍यात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पुन्‍हा आमने-सामने आले आहेत.

'तृणमूल'ने केला धक्‍काबुक्‍कीचा आरोप

अधीर रंजन चौधरी यांनी आमच्‍या कार्यकर्त्याला धक्‍काबुक्‍की केली, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. याचा व्हिडिओही तृणमूलने शेअर केला आहे.

'तृणमूल'ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " भरदिवसा काँग्रेस खासदार आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला हिंसकपणे धक्काबुक्की करताना रंगेहात पकडले गेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे लज्जास्पद कृत्य सर्वांनी पाहावेण असे रेकॉर्ड केले आहे.  हा प्रकार म्‍हणजे 'निव्वळ गुंडागर्दी' म्हटले आहे. बहरामपूरमधील तुमची गुंडगिरी नजरेआड होणार नाही. तुमची निवडणूक हरण्याची भीती तुमच्या कृतीतून स्पष्ट दिसते. कामगार तुम्हाला काहीही मदत करणार नाहीत!"

विशेष म्‍हणजे भाजप विरोधी इंडिया आघाडीमध्‍ये काँग्रेस आणि तृणमूल हे मित्रपक्ष आहेत. मात्र पश्‍चिम बंगालमध्‍ये दोन्‍ही पक्ष स्‍वबळावर निवडणूक लढवत आहेत. बहरामपूरमध्ये अंधीर रंजन चौधरी यांच्‍या विरोधात तृणमूलचे युसूफ पठाण निवडणूक रिंगणात आहेत.

माझ्‍या विरोधात गो बॅकचा नारा दिला…

या घटनेबाबत 'एएनआय'शी बोलताना अधीर रंजन चौधरी म्‍हणाले की, "मी प्रचार आटोपून घरी जात असताना, काही लोक आले आणि त्‍यांना माझ्‍याविरोधात 'गो बॅक'चा नारा देऊ लागले. मी गाडीतून उतरलो. तेव्‍हा गेल्या मी पाच वर्षांत काहीही केले नाही, असा दावा ते करु लागले. त्‍यांनी मी विचारणा केली.

बहरमपूर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्‍ला

1999 पासून अधीर रंजन चौधरी हे बहरमपूर लोकसभा मतदारसंघातून कधीही पराभूत झालेले नाहीत. बहरापूरमध्ये 13 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्व सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news