AAP MP Sanjay Singh | मुख्यमंत्री केजरीवालांना पत्नीला समोरासमोर भेटण्याची परवानगी नाकारली! खा. संजय सिंह यांचा तुरुंग प्रशासनावर आरोप | पुढारी

AAP MP Sanjay Singh | मुख्यमंत्री केजरीवालांना पत्नीला समोरासमोर भेटण्याची परवानगी नाकारली! खा. संजय सिंह यांचा तुरुंग प्रशासनावर आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधित मनी लॉंड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे अनेक नेते अडकले आहेत. सध्या आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद हे देखील या प्रकरणात तिहार जेलमध्ये आहेत. तसेच उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे देखील तुरुंगातच आहेत. दरम्यान, अरविंद केजरीवांच्या पत्नीला समोरासमोर भेटण्याची परवानगी प्रशासनाने नाकारली असल्याचा गंभीर आरोप आप खासदार सिंह यांनी केला. यावरून आप नेत्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अशी अमानवी वर्तणूक का? असा सवाल देखील संजय सिंह यांनी तुरुंग प्रशासन आणि सरकारला केला आहे. ते आज (दि.१३) शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते. (AAP MP Sanjay Singh)

आप खासदार संजय सिंह म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीने त्यांना भेटण्यासाठी अर्ज केला होता. तेव्हा त्यांना तुम्ही समोरासमोर भेटू शकत नाही, तर खिडकीतून भेटा, असे सांगण्यात येते. त्यामुळे सुनीता केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना खिडकीतून भेटत आहेत. यावरून अशी अमानवी वर्तणूक का?… असा सवाल सिंह यांनी प्रशासन आणि सत्ताधारी सरकारला केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना कोणीही भेटू नये यासाठी भाजप तिहार प्रशासनावर दबाव आणत असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला आहे. (AAP MP Sanjay Singh)

मी पूर्ण जबाबदारीने सांगत आहे की, मुख्यमंत्र्यांना अपमानित करण्यासाठी आणि परावृत्त करण्यासाठी केले जात आहे. एखाद्या गुन्ह्यातील भयंकर गुन्हेगारांनाही बॅरेकमध्ये भेटण्याची परवानगी आहे. परंतु तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पत्नीला खिडकीतून भेटण्याची परवानगी आहे, असे सांगण्यात आले. मात्र त्यांना समोरासमोरून भेट घेऊन दिली नाही, असा आरोप नुकत्याच तुरुंगातून सुटलेल्या संजय सिंह यांनी केला. (AAP MP Sanjay Singh)

पंजाब मुख्यमंत्री भगवंत मान यांचेही उदाहरण दिले

यासोबतच आजपर्यंत निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या मुख्यमंत्र्याला  जंगलात भेटावे लागत असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सीएम केजरीवाल यांना भेटण्यासाठी तिहार तुरुंग प्रशासनाने जागा निश्चित केली आहे. त्याच ठिकाणी मुख्यमंत्री मान हे मुख्यमंत्री केजरीवालांना भेटातात. यावरून एका मुख्यमंत्र्याला दुसऱ्या मुख्यमंत्र्याला समोरासमोर भेटू न देणारी ही केंद्राची हुकूमशाही असल्याचा आरोपही खासदार संजय सिंह यांनी केला आहे.

हे ही वाचा:

Back to top button