Baba Tarsem Singh Murder | ३ सेकंद, २ गोळ्या अन्‌ मर्डर…! बाबा तरसेम सिंग हत्याकांडातील शार्पशूटरचा उत्तराखंडमध्ये एन्काउंटर

Baba Tarsem Singh Murder | ३ सेकंद, २ गोळ्या अन्‌ मर्डर…! बाबा तरसेम सिंग हत्याकांडातील शार्पशूटरचा उत्तराखंडमध्ये एन्काउंटर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : उत्तराखंडमधील बाबा तरसेम सिंग हत्या प्रकरणातील आरोपीचा मंगळवारी पहाटे एन्काउंटर करण्यात आला. २८ मार्च रोजी श्री नानकमत्ता साहिब गुरुद्वारा कारसेवा प्रमुख बाबा तरसेम सिंग यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील आरोपी अमरजित सिंग ऊर्फ बिट्टू याला उत्तराखंड स्पेशल टास्क फोर्स (STF) आणि हरिद्वार पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत भगवानपूर पोलीस स्टेशन परिसरात एन्काउंटरमध्ये ठार केले. (Baba Tarsem Singh Murder)

शार्पशूटर अमरजित सिंग याच्या नावावर १ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. तर त्याचा एक साथीदार पळून गेला, अशी माहिती उत्तराखंडचे पोलिस महासंचालक अभिनव कुमार यांनी दिली. उत्तराखंड एसटीएफ आणि हरिद्वार पोलिसांनी फरारी आरोपीला पकडण्यासाठी संयुक्त कारवाई केली, असेही त्यांनी सांगितले.

अमरजित सिंगच्या विरुद्ध १६ पेक्षा जास्त गुन्हे नोंद होते. बाबा तरसेम सिंग यांची उधम सिंग नगर येथील नानकमत्ता गुरुद्वारामध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याआधी रविवारी उधम सिंह नगर पोलिसांनी दोन्ही फरार मुख्य आरोपी (शूटर) अमरजित सिंग आणि सरबजीत सिंग यांना पकडण्यासाठी त्यांच्यावरील बक्षिसाची रक्कम ५० हजारांवरून प्रत्येकी एक लाख रुपये केली होती.

हरिद्वारमधील कलियर रोड आणि भगवानपूर दरम्यान एसटीएफ आणि पोलिस आणि शार्पशूटर अमरजित सिंग उर्फ ​​बिट्टू यांच्यात चकमक उडाली. एसटीएफला अमरजितबद्दल गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार एसटीएफने त्याला घेरले असता त्याने पळून जाण्याच्या प्रयत्न केला. या दरम्यान आरोपींनी गोळीबार केला. पोलिसांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या एन्काउंटरमध्ये मुख्य शूटर मारला गेला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बाबा तरसेम सिंग यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या अन्य तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी एक उत्तर प्रदेशचा तर दोन उत्तराखंडमधील बाजपूर येथील आहेत. बाजपूरच्या आरोपीवर शार्पशूटर्सना रायफल पुरवल्याचा आरोप आहे. (Baba Tarsem Singh Murder)

३ सेकंद, २ गोळ्या अन्‌ खून…

आजतकच्या वृत्तानुसार, २८ मार्च रोजी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांची वेळी होती. डेरा कारसेवा प्रमुख बाबा तरसेम सिंग एका खुर्चीत बसून आराम करत होते. त्यादरम्यान मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी बाबांच्या दिशेने येत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांनी एकामागून एक दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे बाबा जमिनीवर कोसळले. आजूबाजूचे लोक त्यांच्या मदतीसाठी धावतात. पण तोपर्यंत उशीर झाला होता. दोघे हल्लेखोर तेथून पळून गेले होते. केवळ ३ सेकंदात त्यांनी दोन गोळ्या झाडल्या.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news