कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेपाचे आरोप बिनबुडाचे; भारताकडून स्पष्टोक्ती | पुढारी

कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेपाचे आरोप बिनबुडाचे; भारताकडून स्पष्टोक्ती

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचे आरोप बिनबुडाचे असल्याची स्पष्टोक्ती भारताकडून देण्यात आली आहे. लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करणे हे भारताचे कधीच धोरण नव्हते. कॅनडाने भारताच्या अंतर्गत प्रकरणात नाक खुपसणे थांबवावे, असा इशारा भारताच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी दिला आहे.

खरेतर गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये अहवालात केलेल्या दाव्यानुसार कॅनडामध्ये 2019 आणि 2021 मध्ये झालेल्या संघराज्यीय निवडणुकांमध्ये चीनने नाक खुपसले होते. निवडणुकीत जस्टिन ट्रूडो यांचा विजयासाठी मदत केली असल्याचा आरोप चीनवर आरोप करण्यात आला होता, पण हा आरोप चीनने फेटाळून लावला होता. त्यावेळी पंतप्रधान ट्रूडो यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमली होती. कॅनडाच्या निवडणुकीत भारताने हस्तक्षेप केल्याचे पुरावे देण्याची आणि याबाबतची माहिती कॅनडा सरकारला होती काय? आणि त्यासाठी सरकारने कोणती पाऊले उचलली, असा सवाल समितीने उपस्थित केला होता. 2021 मध्ये कॅनडातील निवडणुकांसाठी चीनने आपल्या राजदूतांना आणि मोहिमेसाठी पैसा पुरवला होता. चीनने आपली ही मोहीम कॅनडातील वाणिज्य दूतावासातून चालवली असल्याचे समोर आले होते.

वर्षाअखेरीस अंतिम अहवाल

गेल्या वर्षी कॅनडातील निवडणुकांसंबंधातील एक अहवाल समोर आला होता. चीनने 2019 मध्ये कॅनडातील निवडणुकांमध्ये 11 उमेदवारांना आपला पाठिंबा दिला होता. एका प्रकरणात चीने 2.5 लाख डॉरलपेक्षाही अधिक रक्कम दिली होती. कॅनडातील निवडणुकांमध्ये भारत, चीन आणि रशियानेही हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबतचा पहिला अहवाल 3 मे रोजी सादर होण्याची शक्यता आहे आणि अंतिम अहवाल वर्षाअखेरीस येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button