

पुढारी ऑनलाईन डेस्क : पक्षाच्या जाहीरनाम्याची मुस्लीम लीगशी तुलना केल्याबद्दल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. याप्रकरणी कारवाई करावी, अशी विनंती दिल्लीतील भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काँग्रेसचे शिष्टमंडळाने आज (दि.८एप्रिल) केली.
ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "पंतप्रधान त्यांनी केलेल्या विधानामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे, आमच्या जाहीरनाम्याबद्दल त्यांचा आरोप निराधार आहे. पंतप्रधानांना असे बोलण्याचा अधिकार नाही. ही बाब आम्ही निवडणूक आयोगासमोर ठेवली आहे. गांभीर्याने यावर कारवाई करण्याची विशेष विनंती केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे. जुनी काँग्रेस यामध्ये कोठेही दिसत नाही. यामध्ये डावे प्रबळ झाले आहेत. जे मतदारसंघ काँग्रेसचे बालेकिल्ला मानला जात होते त्या जागांवरही काँग्रेस उमेदवार उभे करण्याचे धाड करत नाही. काँग्रेस ज्या काँग्रेस ज्या व्यक्तीला तिकीट देत आहे तो दुसऱ्या दिवशी काँग्रेस सोडत आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 एप्रिल रोजी राजस्थानच्या अजमेर येथील सभेत केली होती.
आज काँग्रेस पक्षाकडे ना देशहिताची धोरणे आहेत ना देश उभारणीचा दृष्टीकोन आहे. आजच्या भारताच्या आशा आणि आकांक्षांपासून काँग्रेस पक्ष पूर्णपणे तुटलेला आहे. स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिम लीगमध्ये जी विचारसरणी प्रचलित होती तीच विचारसरणी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काँग्रेस अजिबात दिसत नाही. अशी काँग्रेस भारताला २१व्या शतकात पुढे नेऊ शकत नाही, असा दावाही नरेंद्र मोदी यांनी केला होता.
हेही वाचा :