मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी पुन्हा वाढवली | पुढारी

मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी पुन्हा वाढवली

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलले आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतरांची न्यायालयीन कोठडी १८ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. अलीकडेच त्यांनी तिहार तुरुंगातून त्यांच्या मतदार संघ पटपरगंजमधील लोकांना पत्र लिहिले होते. ज्यामध्ये त्यांनी तुरुंगाबाहेर लवकरच भेटणार असल्याचे सांगितले होते.

सिसोदिया यांना का अटक केली आहे?

मनीष सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने २६ फेब्रुवारी २०२३ रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक केली होती.

हेही वाचा : 

Back to top button