BJP Foundation Day 2024 | ‘भाजप’ देशातील पसंतीचा पक्ष; लोक आणखी एक संधी देतील, भाजप स्थापनादिनी पीएम मोदींचा संदेश

PM MODI
PM MODI
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज (दि.६) भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच 'भाजप' देशातील पसंतीचा पक्ष असून, 'राष्ट्रप्रथम' हा मंत्र घेऊन जनतेची सेवेत मग्न असल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील पोस्ट पीएम मोदी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली आहे. (BJP Foundation Day 2024)

पुढे पीएम मोदी यांनी म्हटले आहे की, वर्षानुवर्षे आपल्या कष्टाने, संघर्षाने आणि बलिदानाने पक्षाला या उंचीवर नेणाऱ्या त्या सर्व महान व्यक्तींना आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे. आज मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की, भाजप हा देशातील सर्वात आवडता पक्ष आहे, जो 'नेशन फर्स्ट' हा मंत्र घेऊन जनतेची सेवा करण्यात मग्न आहे.

'NDA' आगामी काळात मजबूत होणार

एनडीएचा (NDA) अविभाज्य भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण ही आघाडी देशाची प्रगती आणि प्रादेशिक आकांक्षा पुढे घेऊन भारताला पुढे नेण्यात विश्वास देते. एनडीए ही अशी युती आहे, जी देशाच्या विविधतेच्या सुंदर रंगांनी सजलेली आहे. आमची ही भागीदारी खूप महत्त्वाची आहे आणि मला खात्री आहे की, आमची युती आगामी काळात आणखी मजबूत होईल. (BJP Sthapna Diwas)

माझे कुटुंबीय आणखी एका कार्यकाळासाठी आशीर्वाद देतील

नवी लोकसभा निवडण्यासाठी देशातील जनता पूर्णपणे तयार आहे. मला विश्वास आहे की, देशभरातील माझे कुटुंबीय आम्हाला आणखी एका कार्यकाळासाठी आशीर्वाद देतील. जेणेकरून गेल्या दशकात विकसित भारतासाठी जो पाया बांधला गेला आहे त्याला नवीन बळ मिळू शकेल. सरकार आणि जनता यांच्यातील विकासाचा सर्वात मजबूत दुवा असलेल्या भाजपा आणि एनडीएच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मी पुन्हा एकदा माझ्या शुभेच्छा देतो, असेदेखील पीएम मोदी यांनी म्हटले आहे. (BJP Foundation Day 2024)

हे ही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news