NIA team attacked in W. Bengal: पं. बंगालमध्ये ED नंतर आता NIA च्या पथकावर हल्ला; २ अधिकारी जखमी | पुढारी

NIA team attacked in W. Bengal: पं. बंगालमध्ये ED नंतर आता NIA च्या पथकावर हल्ला; २ अधिकारी जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क: पं. बंगालमध्ये तपास यंत्रणांवरील हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. काही दिवसांपूर्वी पं.बंगालमधील संदेशखालीमध्ये जमावाने ईडीच्या पथकाला लक्ष्य केले होते. त्यानंतर आज (दि.६) पुन्हा एकदा पं. बंगालमधील पूर्व मेदिनीपूरच्या भूपतीनगरमध्ये केंद्रीय एजन्सी NIA च्या पथकावर हल्ला करण्यात आला. यावेळी तपास यंत्रणेच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. जमावाच्या या हल्ल्यात तपास पथकातील दोन अधिकारी जखमी झाले आहेत. (NIA team attacked in W. Bengal)

या घटनेची माहिती देताना एनआयएने सांगितले की, कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एनआयएचे पथक शनिवारी तपासासाठी दाखल झाले होते. एनआयएचे अधिकारी भूपतीनगर येथे स्फोटाची चौकशी करण्यासाठी गेले होते. NIA दोघांना अटक करून घेऊन जात असताना, गावकऱ्यांनी NIA च्या गाडीला घेराव घातला आणि त्यांच्या सुटकेची मागणी करत गाडीवर हल्ला केला. तपास करणाऱ्यांच्या गाडीची तोडफोड केल्याचा आरोप आहे. यामध्ये एनआयएचे दोन अधिकारी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. (NIA team attacked in W. Bengal)

बॉम्बस्फोट प्रकरणातील NIA च्या तपासादरम्यान हल्ला

पोलिसांनी सांगितले की, एनआयएचे अधिकारी 2022 च्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासासाठी गेले होते. ते पुढे म्हणाले की, एनआयए अधिकाऱ्यांच्या पथकाने आज (दि.६) सकाळी या प्रकरणाच्या संदर्भात दोन लोकांना अटक केली. त्यानंतर हे पथक कोलकात्याला परत जात असताना एनआयएच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. (NIA team attacked in W. Bengal)

NIA चौकशी सुरू असलेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या संदर्भात पोलीस तक्रारही दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले की, केंद्रीय पोलिस दलाचा मोठा ताफा भूपतीनगरला पोहोचला आहे, जिथे अटक केलेल्या दोघांसह एनआयएची टीम देखील उपस्थित आहे. ३ डिसेंबर2020 रोजी भूपतीनगर येथील कच्च्या घरात झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. नंतर तपास एनआयएकडे सोपवण्यात आला असल्याचे देखील एनआयएने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

 

Back to top button