K Kavitha: के. कविता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ४ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली | पुढारी

K Kavitha: के. कविता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ४ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

पुढारी ऑनलाईन डेस्क: कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यातील सहभागावरून बीआरएस नेत्या के. कविता यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) अटक केली होती. त्यानंतर त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली. आज (दि.१) त्यांच्या जामीन याचिकेवर न्यायालयात थोक्यात सुनावणी झाली. दरम्यान के.कविता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने गुरूवार ४ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे, या सदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (K Kavitha)

बीआरएस नेत्या के.कविता यांनी अंतरिम किंवा नियमित जामीन मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, न्यायाधीशांनी या प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली आहे. तोपर्यंक के.कविता यांचे वकील अभिषेक सिंघवी यांना तुम्हाला कोणता जामीन हवा आहे हे ठरवण्यास सांगितले आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी गुरूवारी ४ एप्रिल रोजी होणार असल्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केले. (K Kavitha)

के. कविता यांना कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यातील सहभागाबद्दल अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 15 मार्च रोजी अटक केली होती. ईडीने त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानावर दिवसभर छापे टाकल्यानंतर के.कविता यांना ताब्यात घेतले होते. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात त्यांना हजर केले असता न्यायालयाने कविता यांना मंगळवार ९ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली होती. दरम्यान त्यांनी सुटकेसाठी जामीन अर्ज दाखल केला होता. यावर आज सुनावणी झाली. परंतु ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. (K Kavitha)

हे ही वाचा:

 

Back to top button