Bengaluru Rameshwaram Cafe Blast | रामेश्वरम कॅफेतील स्फोटप्रकरणी एकजण ताब्यात, NIA ची कारवाई | पुढारी

Bengaluru Rameshwaram Cafe Blast | रामेश्वरम कॅफेतील स्फोटप्रकरणी एकजण ताब्यात, NIA ची कारवाई

पुढारी ऑनलाईन : बंगळूरमधील रामेश्वरम कॅफेतील स्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एनआयएने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव शब्बीर असे आहे. त्याला कर्नाटकातील बल्लारी येथून ताब्यात घेण्याच आल्याचे समजते. (Bengaluru Rameshwaram Cafe Blast) सध्या संशयिताची चौकशी सुरू आहे.

१ मार्च रोजी बंगळूर येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटात १० जण जखमी झाले होते. कॅफेत टायमरचा वापर करून आयईडी बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला होता. पोलिसांनी मुख्य संशयित दिसत असलेले अनेक सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केल्यानंतर आज बुधवारी एनआयएने संशयिताला ताब्यात घेण्याची कारवाई केली.

१ मार्च रोजी ३० वर्ष वयाचा एक संशयित व्यक्ती कॅफेमध्ये इडलीची प्लेट घेऊन जात असल्याचे दिसून आले होते. त्यांच्या खांद्याला एक बॅग दिसून आली होती. त्यात आतमध्ये आयईडी बॉम्ब असल्याचा संशय होता. दुसऱ्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोच संशयित बॅग घेऊन रेस्टॉरंटकडे जाताना दिसला होता.

आणखी तीन सीसीटीव्ही व्हिडिओंचे विश्लेषण केल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी ९ मार्च रोजी सांगितले होते की, कॅफेमधील स्फोटानंतर संशयिताने अनेकवेळा त्याचा पेहराव बदलला होता.

एका व्हिडिओमध्ये तो फुल स्लीव्ह शर्ट आणि फिकट रंगाची पोलो कॅप, चष्मा आणि चेहऱ्यावर मास्क घातलेला दिसला होता. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो जांभळ्या रंगाचा हाफ-स्लीव्ह टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळी टोपी घातलेला दिसला. दरम्यान, तिसऱ्या फुटेजमध्ये संशयित टोपी अथवा चष्मा घातलेला दिसत नाही.

NIA ने संशयिताची कोणत्याही प्रकारची माहिती देणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दरम्यान, रामेश्वरम कॅफे ८ मार्च रोजी पुन्हा सुरू झाला होता. (Bengaluru Rameshwaram Cafe Blast)

हे ही वाचा :

 

Back to top button