Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफेत स्फोट; संशयित आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला (Video) | पुढारी

Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफेत स्फोट; संशयित आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगळूरमधील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी (दि. १) झालेला स्फोटात ९ जण जखमी झाले होते. ‘बंगळूरमधील रामेश्वरम कॅफेमधील स्फोट हा (Rameshwaram Cafe Blast ) एचएएल पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कुंडलहल्ली नजीक झाला. यानंतर पोलिस आणि संरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, तपासातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. ज्या कॅफेमध्ये कोणीतरी एक बॅग ठेवल्याचे समजते आहे. या बॅगेत आयईडी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कॅफेतील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, पोलीस त्याचा तपास करत आहेत.’ (Rameshwaram Cafe Blast )

बंगळुरातील प्रसिद्ध कॅफे

रामेश्वर कॅफे हे बंगळुरुतलं सर्वात प्रसिद्ध कॅफे आहे. या कॅफेत नेहमीच गर्दी असते. शुक्रवारी दुपारी अशीच गर्दी कॅफेत होती. सर्व काही ठिकठाक सुरु होते. कर्मचारी काम करत होते. तेव्हा अचानक धूर पसरतात आणि स्फोटाचा आवाज येतो. यानंतर एकच धावाधाव होताना दिसत आहे.

सीसीटीव्ही फुटेज समोर

या स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. व्हिडिओमध्ये सुरुवातीला कॅफेमध्ये ग्राहक बसलेले दिसताहेत. कर्मचारी नेहमीप्रमाणे कामे करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, सीसीटीव्ही समोर अचानक धूर पसरतो आणि स्फोट होतो. त्यामुळे घाबरलेले ग्राहक इकड-तिकडे पळताना दिसत आहेत. धूर कमी झाल्यानंतर लोक जमिनीवर पडलेले दिसतात. यामध्ये काही ग्राहक धावत बाहेर पडतात. काही जण जखमी झालेले दिसतात. काहीजण मोठ्याने ओरडताना दिसत आहेत.

या घटनेवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणतात की, ज्या व्यक्तीने कॅफेत बॅग ठेवली होती, तो व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅश काऊंटवर टोकन घेताना दिसला आहे. आता या प्रकरणी आता कॅशिअरशी चौकशी केली जात आहे.

दरम्यान या स्फोटानंतर तत्काळ फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. ते या प्रकरणाता तपास करत आहेत. स्फोट घडवून आणणाऱ्या घटनांचा शोध घेण्यासाठी पोलिस जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Back to top button