NEET 2024 : दूरस्थ शिक्षण घेणाऱ्यांनाही ‘नीट’ची परीक्षा देता येणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

NEET 2024 : दूरस्थ शिक्षण घेणाऱ्यांनाही ‘नीट’ची परीक्षा देता येणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : जाल खंबाटा : दूरस्थ शिक्षण पद्धतीतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही आता 'नीट'ची परीक्षा देता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणापासून वंचित ठेवणारा निर्णय रद्द केल्याने देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना आता संधी मिळू शकणार आहे.

नॅशनल एलिजिबिलीटीकम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात 'नीट' ही परीक्षा वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी अनिवार्य आहे. या परीक्षेला देशभरातून दरवर्षी लाखो विद्यार्थी बसत असतात. मात्र, दूरस्थ शिक्षण पद्धतीतून पदवीपूर्व शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'नीट' परीक्षा देता येत नव्हती. कारण, २७ वर्षांपूर्वी त्याबाबत निर्णय घेण्यात आला होता; पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत. न्या. पी. एस. नरसिम्हा आणि न्या. अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने मेडिकल कौन्सिलच्या याचिकेवर हा निकाल दिला आहे. दूरस्थ शिक्षण पद्धतीतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही 'नीट'ची परीक्षा देण्यास पात्र ठरवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मेडिकल कौन्सिलने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या निकालामुळे आता सीबीएसई मान्यताप्राप्त संस्थांतून दूरस्थ शिक्षण पद्धतीने १२ वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी मिळू शकणार आहे. आतापर्यंत गेल्या २७ वर्षांत हजारो विद्यार्थी या संधीपासून वंचित राहिले होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news