Hyderabad Liberation Day : दरवर्षी १७ सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्ती दिन’ म्हणून साजरा होणार | पुढारी

Hyderabad Liberation Day : दरवर्षी १७ सप्टेंबर हा 'हैदराबाद मुक्ती दिन' म्हणून साजरा होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत सरकारने दरवर्षी १७ सप्टेंबर हा  ‘हैदराबाद मुक्ती दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेन ट्विट करत माहिती दिली आहे. (Hyderabad Liberation Day)

Hyderabad Liberation Day : ‘हैदराबाद मुक्ती दिन’

केंद्रीय गृहमंत्रालया प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हैदराबादला तेरा महिने स्वातंत्र्य मिळाले नाही. तर ते निजामाच्या अधिपत्याखाली होते.  ‘ऑपरेशन पोलो’ या पोलिस कारवाईनंतर हा प्रदेश निजामाच्या राजवटीतून १७ सप्टेंबर १९४८ रोजी मुक्त झाला. या भागातील लोकांकडून १७ सप्टेंबर हा दिवस  हैदराबाद मुक्ति दिन साजरा करावा अशी मागणी होवू लागली.  “आता हैदराबाद मुक्त करणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आणि तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी, भारत सरकारने दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं अधिसूचनेमध्ये नमूद केले आहे.

हेही वाचा 

Back to top button