Ashneer Grover : ‘शार्क टँक’फेम अश्नीर ग्रोवर यांना ‘यूके’ला जाण्‍यास मज्‍जाव! | पुढारी

 Ashneer Grover : 'शार्क टँक'फेम अश्नीर ग्रोवर यांना 'यूके'ला जाण्‍यास मज्‍जाव!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘शार्क टँक इंडिया’ फेम अश्नीर ग्रोवर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांना दिल्ली पोलिसांनी ब्रिटनमध्ये (युके) जाण्याची परवानगी नाकारली आहे.अश्नीर आणि माधुरी यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) येथे व्याख्याते म्हणून जायचे होते. त्यामुळे त्यांनी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) तपास अधिकाऱ्याकडे ९ मार्च ते १५ मार्च दरम्यान  जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली आहे. (Ashneer Grover)

 Ashneer Grover : कोर्टात जिंकत राहीन…

माहितीनुसार, अश्नीर ग्रोवर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांना ९ मार्च ते १५ मार्च दरम्यान यूकेला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) येथे व्याख्याते म्हणून जायचे होते. त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने जाण्याची परवानगी नाकारली आहे. याबाबत अश्नीर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “माझा आणि आर्थिक गुन्हे शाखेमधील पत्रव्यवहार गोपनीय आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार, मी या प्रकरणात पोलिसांना सहकार्य करत राहीन आणि कोर्टात जिंकत राहीन. मला अद्याप आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रवास परवानगी संबंधित कोणताही पत्रव्यवहार मिळालेला नाही.”

अश्नीर ग्रोवर यांच्यावर गेल्या वर्षी मे महिन्यात भारतपे येथे गैरव्यवहार केल्याचा आरोप झाल्यानंतर अडचणीत आले होते. कलम ४०६ (विश्वासाचा गुन्हेगारी भंग), ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेची डिलिव्हरी करणे), ४६८ (फसवणूक करण्याच्या हेतूने खोटी), ४७१ (खोटे कागदपत्रे खरा म्हणून वापरणे) आणि १२० अंतर्गत त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा 

Back to top button