भाजपला दक्षिणेत बळ : चंद्राबाबू नायडू लवकरच NDAमध्ये; अमित शाह, नड्डांसोबत खलबते | पुढारी

भाजपला दक्षिणेत बळ : चंद्राबाबू नायडू लवकरच NDAमध्ये; अमित शाह, नड्डांसोबत खलबते

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी आघाडी केल्यानंतर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) आणखी एक जुने सहकारी चंद्राबाबू नायडू आता भाजपसोबत येण्याच्या तयारीत आहेत. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या तेलुगु देसम पक्षाने ६ वर्षांपूर्वी भाजपची साथ सोडली होती. पण आता बदलत्या राजकारणात चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत मैत्रीची तयारी केलेली आहे.

जर तेलुगु देसम पक्षाने भाजपशी युती केली, तर आंध्र प्रदेशात भाजप-तेलुगु देसम-जनसेना अशी आघाडी होईल. या तिन्ही पक्षात शुक्रवारी जागावाटप संदर्भात बैठक होणार आहे. जनसेना पक्षा हा सिनेअभिनेता पवन कल्याण यांचा पक्ष आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी २०१८मध्ये भाजपची साथ सोडली होती. बदलत्या राजकीय स्थितीत पवन कल्याण यांनी यापूर्वीच तेलुगु देसमसोबत युती केली आहे. या युतीत भाजपही सहभागी व्हावा, असे त्यांचे प्रयत्न होते. आंध्र प्रदेशात २५ लोकसभा मतदारसंघ आहेत, यातील १० जागा लढवण्यासाठी भाजप इच्छुक आहे. दरम्यान भाजप ओडिशात मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासोबतही युतीच्या प्रयत्नात आहे.

हेही वाचा

Back to top button