पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.८) दिल्लीतील भारत मंडपम येथे पहिल्या वहिल्या नॅशनल क्रियटर्स ॲवॉर्ड (National Creators Award) पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रातील २० जणांना यावेळी सन्मानित करण्यात आले. पीएम मोदींनी मुंबईतील २४ वर्षीय मल्हार कळंबे यांना यावर्षीचा 'स्वच्छता दूत' पुरस्कार प्रदान केला.
दरम्यान, स्वच्छतेच्या मुद्यावरून बोलताना मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024) भारत मंडपम येथी कार्यक्रमात पीएम मोदींच्या हस्ते मल्हार कळंबे यांना 'स्वच्छता दूत' पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पीएम मोदी यांनी "प्रत्येक प्रकारच्या साफसफाईसाठी कामी येईल, या निवडणुकीतही सुफडसाफ होणार आहे…" असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024)
२४ वर्षीय तरुणी गेल्या पाच वर्षांपासून मुंबईत समुद्रकिनारी स्वच्छता करत आहे. ते त्यांंनी राबविलेल्या उपक्रमांकडे लक्ष वेधणे, पर्यावरण संवर्धन आणि प्लॅस्टिक प्रदूषणाविषयी जागरूकता निर्माण करणे, ऑन-ग्राउंड क्लीन-अप उपक्रमांमध्ये मदत करणे, स्वयंसेवकांना एकत्र आणणे यासाठी तो सोशल मीडियाचा वापर करतो. त्याचे 'इंस्टाग्राम फीड' हे देखील वर्णन करते की, मल्हार कळंबे हे त्यांच्या कारणासाठी विविध भागधारकांना-लोक, अधिकारी, सेलिब्रिटी आणि कॉर्पोरेट्स- एकत्र कसे आणतात. (Lok Sabha Election 2024)
हेही वाचा: