Lok Sabha Election 2024: ‘मविआ’सोबत अद्याप युती नाही ; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची स्‍पष्‍टाेक्‍ती | पुढारी

Lok Sabha Election 2024: 'मविआ'सोबत अद्याप युती नाही ; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची स्‍पष्‍टाेक्‍ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी ‘मविआ’मधील पक्षाच्या प्रवक्यांनी वंचित बहुजन आघाडीचा मविआत समावेश झाल्याचे स्पष्ट केले होते; परंतु, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अद्याप मविआसोबत युती पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भातील माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

इतर पक्षांच्या बैठकी, कार्यक्रमाला उपस्थित राहू नये- कार्यकर्त्यांना आवाहन

वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरील  पोस्टमध्ये म्हटले आहे की, “वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. ॲड. प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये, असे देखील आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही वाचा:

Back to top button