‘शहाजहान शेखला अटक करा’ : 'संदेशखाली' प्रकरणी प. बंगाल सरकारला न्‍यायालयाने फटकारले | पुढारी

‘शहाजहान शेखला अटक करा’ : 'संदेशखाली' प्रकरणी प. बंगाल सरकारला न्‍यायालयाने फटकारले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांचे लैंगिक शोषण आणि जमीन बळकावल्याचा आरोप असलेल्या तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याला अटक करा, असा आदेश देत कोलकाता उच्च न्यायालयाने आज ( दि २६ फेब्रुवारी)  प. बंगाल सरकारला फटकारले.

पश्चिम बंगालमधील २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखाली गावात काही महिलांवर सामूहिक अत्याचार तसेच गरिबांची जमीन बळकावण्याचे प्रकार झाल्याचा आरोप आहे. यावरून राज्यात सत्तारूढ तृणमूल काँग्रेस तसेच विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्‍यारोप सुरु आहेत.

आज या प्रकरणी दाखल याचिकांवरील झालेल्‍या सुनावणीवेळी काेलकाता उच्‍च न्‍यायालयाने आरोपांनंतरही कोणतीही कारवाई केली नसल्‍यामुळे निष्क्रियतेबद्दल सरकारला फटकारले. तसेच या प्रकरणी चार वर्षांपूर्वी राज्य पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्‍यासालठी चार वर्षे लागली आहेत,” असेही न्‍यायालयाने सुनावले.

या प्रकरणातील आरोपी शहाजहान शेख याला अटक करण्‍यास स्‍थगिती देण्‍याचे अंतरिम आदेश दिला गेला आहे, असे भासविण्‍यात आले. मात्र त्‍याच्‍या अटकेला स्‍थगिती दिली, असा कोणताही आदेश नाही. त्‍यामुळे त्‍याला तत्‍काळ अटक करण्‍यात यावी, असा आदेश कोलकाता उच्‍च न्‍यायालयाच्‍या खंडपीठाने दिला.

हेही वाचा : 

 

Back to top button