Jharkhand News: झारखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश | पुढारी

Jharkhand News: झारखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी, खासदार गीता कोडा यांनी आज (दि.२६) भाजपमध्ये प्रवेश केला. झारखंडमधील रांची येथील भाजप कार्यालयात राज्याचे भाजप प्रमुख बाबूलाल मरांडी यांच्या उपस्थितीत गीता यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. (Jharkhand News)

गीता कोडा या झारखंडमधील सिंहभूम मतदारसंघाच्‍या खासदार आहेत. आज (दि.२६) त्‍यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गीता कोडा झारखंडमधील काँग्रेस, जेएमएम आणि आरजेडी युतीवर नाराज आहेत, असे ‘एएनआय’ने सूत्रांच्‍या हवाल्‍याने म्‍हटलं आहे. त्‍यांचा भाजपमधील प्रवेश लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. पत्नी गीता कोडा यांच्यासह मधु कोडा हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत, असे वृत्त देखील माध्यमांकडून देण्यात आले आहे. (Jharkhand News)

झारखंड काँग्रेस खासदार असलेल्या गीता गोडा या 2009 ते 2019 या काळात दोनदा आमदार झाल्या आहेत. त्या पहिल्यांदाच सिंहभूम लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. तर त्यांटे पती मधू कोडा हे सप्टेंबर 2006 ते ऑगस्ट 2008 पर्यंत झारखंडचे मुख्यमंत्री होते.

हेही वाचा: 

Back to top button