पुढारी ऑनलाईन डेस्क : रांची कसोटी सामन्यात आज ( दि. २६ फेब्रुवारी ) टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने इतिहास रचला. भारताच्या दुसर्या डावात तो ३७ धावांवर बाद झाला खरा;पण त्याच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. जैस्वाल हा कसोटी क्रिकेटमधील पदार्पणातील पहिल्या ८ सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. पदार्पणातील पहिल्या आठ सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. ( Yashasvi Jaiswal record most runs by indians in first eight test of career create history )
यशस्वी जैस्वाल याने आतापर्यंत 8 कसोटी सामन्यांमध्ये 973 धावा करण्याचा विक्रम केला आहे. कारकिर्दीतील पहिल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी पहिल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 1210 धावा केल्या होत्या. तर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आपल्या पहिल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 936 धावा करण्याचा पराक्रम केला होता. ( Yashasvi Jaiswal record most runs by indians in first eight test of career create history )
सर्वाधिक धावा करण्याबाबत यशस्वी जैस्वाल याने टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या विक्रमाची बरोबरी केली हाेती. इंग्लंड विरुद्ध सुरु असणार्या मालिकेत यशस्वीने आतापर्यंत ६५५ धावा केल्या आहेत. या मालिकेतील एक कसोटी सामना बाकी आहे. कोहलीने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध 8 डावात 655 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर भारतात खेळल्या गेलेल्या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावस्करच्या नावावर आहे. गावस्कर यांनी 1978 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 9 डावात 732 धावा केल्या होत्या.
हेही वाचा :