India vs England 3rd Test Day 3 : यशस्‍वी जैस्‍वालच्‍या शतकी खेळीमुळे भारताला ३२२ धावांची निर्णायक आघाडी

जैस्‍वाल आणि शुभमन यांच्‍या दीडशतकी भागीदारीमुळे राजकोट कसोटीत भारताने निणार्यक आघाडी घेतली आहे.
जैस्‍वाल आणि शुभमन यांच्‍या दीडशतकी भागीदारीमुळे राजकोट कसोटीत भारताने निणार्यक आघाडी घेतली आहे.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील राजकोट कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा (दि. १७) खेळ संपला तेव्‍हा भारताने दुसऱ्या डावात २ गडी गमावत १९६ धावा केल्‍या आहेत. यशस्‍वी जैस्‍वालचे शतक आणि शुभमन गिलच्‍या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाला या सामन्‍यात 322 धावांची निर्णायक आघाडी मिळाली आहे. ( India vs England 3rd Test Day 3 )

तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्‍हा. शुभमन गिल ६५ तर कुलदीप यादव ३ धावांवर खेळत आहेत. यशस्वी जैस्वाल 104 धावा करून रिटायर्ड हर्ट झाला. इंग्लंडकडून जो रूट आणि टॉम हार्टली यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा 19 धावांवर तर ​​रजत पाटीदार खाते न उघडता बाद झाला. टीम इंडियाने भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. तर इंग्‍लडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटाेपला. (India vs England 3rd Test Day 3 )

दुसर्‍या डावात जैस्वालचे दमदार शतक, शुभमनचे अर्धशतक

तिसर्‍या दिवसाचा (१८ फेब्रुवारी) खेळ संपला तेव्‍हा भारताने २ गडी गमावत १९६ धावा केल्‍या.  यशस्वी जैस्वाल याने 122 चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजीत करत त्‍याने दमदार शतकी खेळी साकारली.  राेहित १९ धावांवर बाद झाल्‍यानंतर जैस्‍वाल आणि शुभमन यांनी भारताचा डाव सावरला. या जाेडीच्‍या शतकी भागीदारीमुळे भारताने दुसऱ्या डावात 1 विकेट गमावून दीडेश धावांचा टप्‍पा पूर्ण केला. शुभमन गिलने याने फिरकीपटू मार्क वुडला षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह संघाच्या एकूण आघाडीने 300 धावांचा टप्पाही पार केला.

रोहित शर्मा १९ धावांवर आऊट

जो रूटने दुसऱ्या डावात इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला यष्टीचीत केले. रोहित 28 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. रोहितने पहिल्या डावात 131 धावा केल्या होत्या.

मोहम्मद सिराजने घेतले ४ बळी

तिसर्‍या दिवशी लंचनंतर इंग्‍लडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटाेपला. पहिल्‍या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने ४ बळी घेतले. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्‍येकी दोन तर जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. इंग्लंडकडून बेन डकेट याने सर्वाधिक १५३ धावा केल्‍या. कर्णधार बेन स्टोक्स याने ४१ तर ऑली पोप याने ३९ धावांचे योगदान दिले. याशिवाय अन्‍य कोणत्‍याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही.

इंग्‍लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर गुंडाळला

७१व्या षटकाचा टॉम हार्टलीला तंबूत धाडत रवींद्र जडेजाने इंग्लंडला 9वा धक्का दिला. हार्टले यष्टीचीत झाला. यानंतर ७२ व्‍या षटकातच्‍या पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजने जेम्स अँडरसनला बोल्ड करत इंग्‍लंडचा डाव ३१९ धावांवर गुंडाळला. मार्क वुड ४ धावा करून नाबाद राहिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news